Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2026 | 02:47 PM
Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Follow Us
Follow Us:
  • जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
  • दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी १२ उपाययोजना
  • दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी १२ उपाययोजना
चंद्रपूर: जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. दुष्काळग्रस्त भागातील नागरिक, शेतकरी व पशुधनाला आवश्यक मदत वेळेत मिळावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त क्षेत्रांसाठी विशेष बाब म्हणून १२ प्रकारच्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले. जमीन महसुलात सूट देण्याबाबत तालुकानिहाय किती सवलत द्यावी लागणार आहे, याची माहिती तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले.

पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत जिल्ह्यात आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले, किती कर्जमाफी झाली आणि किती शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे, याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी त्वरित द्यावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये कर्ज पुनर्गठनाबाबत माहिती देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत बँकांना लेखी आदेश देण्यात यावेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून कर्जवसुली होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शुभम दांडेकर, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुरेश कुमरे, आशिष सोनोने, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर आदी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी १२ उपाययोजना

दुष्काळग्रस्त क्षेत्रासाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर, शेतपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची व्यवस्था, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच नागरिक व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन या उपाययोजनांचा समावेश आहे.

ST Bank Investigation : एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी; सहकार विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, नेमकं काय घडलं?

प्रत्येक ग्रामपंचायतीत रोजगाराचे काम

दुष्काळग्रस्त तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान एक काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. कृषीपंपाच्या चालू वीजबिलात सवलत देण्याबाबत महावितरणने आवश्यक नियोजन करावे. तसेच दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध विभागांनी प्रस्तावित कामे हाती घ्यावीत. या कामांची माहिती २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत नागरिकांना देण्याचेही निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार स्तरावर सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur drought relief measures for farmers in 12 talukas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
4

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.