
Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई
इंदिरानगर येथील रहिवासी मो. शफीक ऊर्फ पप्पुभाई शेख यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवीन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसताना जुनी पाइपलाइन बंद करण्यात आल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी पाणी येते, तेथे धार अत्यंत बारीक असल्याने दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत जुने घरगुती तसेच सार्वजनिक नळ कनेक्शन तत्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा नगर परिषद कार्यालयावर घागरफोड आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन संपूर्ण नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांडून केली जात आहे. नागरिकांनी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
वाढोणा, (वा.), केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत ‘हर घर नल से जल’ अंतर्गत नागभीड तालुक्यातील आलेवाही येथील पाणीपुरवठा योजना ३ वर्षापासून मंजूर करण्यात आली आहे. पण कधी निधीची अडचण तर कधी कंत्राटदार तर कधी कामातील अनियमतेमुळे येथील नागरिकांना शुद्ध पाणी कधी मिळणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांना नळ योजनेच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत जनजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यात व तालुक्यात पाणीपुरवठा योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
Manikrao Kokate Bail: माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
त्यानंतरच पाणीपुरवठा योजनेत कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गावोगावी जल जीवन मिशनचे कामे अद्यापही पूर्ण झालेले नाही. नागभीड तालुक्यातील आलेवाही हे शेवटच्या टोकावर असेलेले जंगलव्याप्त गाव आहे. या ठिकाणी गट ग्रामपंचायत आहेत. गावातील लोकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी आता केली जात आहे.