Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: निधीअभावी ‘जलजीवन मिशन’ ठप्प! देयकाच्या फक्त 8% निधी मिळाल्याने कामाला लागला ब्रेक

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. निधी आला नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 04, 2026 | 01:52 PM
Chandrapur News: निधीअभावी ‘जलजीवन मिशन’ ठप्प! देयकाच्या फक्त 8% निधी मिळाल्याने कामाला लागला ब्रेक

Chandrapur News: निधीअभावी ‘जलजीवन मिशन’ ठप्प! देयकाच्या फक्त 8% निधी मिळाल्याने कामाला लागला ब्रेक

Follow Us
Follow Us:
  • जलजीवन मिशनला पैशांचा दुष्काळ!
  • पाण्यासाठी योजना, पण निधीच नाही!
  • जलजीवन मिशनची गाडी रेंगाळली
चंद्रपूर: ‘हर घर जल’ असा नारा देऊन जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनला निधीची चणचण भासू लागली आहे. योजना गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकार पाहिजे तितका निधी देत नसल्याने कंत्राटदारांची कोट्यवधींचे देयक थकीत आहे. काही दिवसांपूर्वीच कंत्राटदारांच्या देयकापोटी पाच कोटींचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला आला. कंत्राटदारांना ६० कोटी देणे असताना पाच कोटी आले. देयकाच्या तुलनेत ही रक्कम केवळ ८ टक्के एवढी असल्याने कोणाचा हिशेब करावा असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.

Chandrapur News: चंद्रपूर महापौरपदाचा पेच कायम! उबाठा-वंचित गट नोंदणीने वाढली काँग्रेसची डोकेदुखी, भाजपची गणिते जुळणार?

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. २०१८-१९ या वर्षात जलजीवन मिशनचे नियोजन करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्यात २०२२ पासून कामाला सुरवात करण्यात आली. कामांची संख्या लक्षात घेता २९६ कंत्राटदारांची निवड करण्यात आली. या कामांची डेडलाईन २०२४ होती. वेळेत कामे पूर्ण व्हावी यासाठी सुरुवातीला केंद्र आणि राज्य शासनाकडून वेळेवर निधी मिळत गेला. या निधीतून सुरुवातीला बऱ्यापैकी कामे झाली. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात निधी येणे बंद झाले. त्याचा मोठा परिणाम या कामांवर झाला.

अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. दरम्यानच्या काळात निधी येईल असे वाटले होते. मात्र, निधी आलाच नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली, वेळेत ही कामे करण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे निर्देश होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेने कंत्राटदारांची बैठक बोलावली. त्यांना सूचना दिल्या. मात्र, त्यानंतरही त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने कंत्राटदारांना दंड ठोठावला होता. यामुळे काही कंत्राटदारांनी पुन्हा कामे सुरू केली होती. आपल्या जवळचा पैसा लावला. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने निधी देण्यास आखुडता हात घेतल्याने सध्या जिल्हाभरातील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत.

देयकांसाठी कंत्राटदाराच्या चकरा वाढल्या

कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मागील आठवड्यात जलजीवन मिशनसाठी पाच कोटींचा निधी मिळाला. निधी मिळताच जिल्हा परिषदेकडे कंत्राटदारांच्या चकरा वाढल्या आहेत. आपली देयके कशी लवकर निघतील या दृष्टीने कंत्राटदारांचे प्रयत्न सुरू आहेत. जलजीवन मिशनची कामे घेणाऱ्या कंत्राटदारांची संख्या २९६ इतकी आहे. या कंत्राटदारांचे जवळपास ६० कोटी रुपये देणे आहे. कामे मोठ्या प्रमाणावर रेंगाळली असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशनसाठी निधी येईल अशी अपेक्षा जिल्हा परिषद आणि कंत्राटदारांना होती. मात्र, त्यांच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. केवळ पाच कोटींचा निधी मिळाला. त्यामुळे यातून कुणाकुणाची देयके अदा करायची असा प्रश्न ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.

Chandrapur News: पाणी प्रश्न ऐरणीवर! चिमुरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण, अनेक भागांत भीषण पाणीटंचाई

पाणीटंचाईचे सावट

ऐन उन्हाळ्याला प्रारंभ होत आहे. जिवती तालुक्यासह अन्य काही तालुक्यात पाण्याची दरवर्षी टंचाई निर्माण होते. अशा स्थितीत जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाली असती तर पाण्यासाठी पायपीट थांबली असती. मात्र, वेळेवर निधीच मिळत नसल्याने आता कंत्राटदारांनीही हात वर केले आहे. निधी आल्यावरच कामे सुरू करू अशी भूमिका कंत्राटदारांची आहे. कंत्राटदारांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषद प्रशासनही हतबल आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Jal jeevan mission collapse amid fund crunch only 8 percent payments released chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Jal Jeevan Mission
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
1

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण
2

Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर
3

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम
4

Satara Water Crisis News: १४ कोटींची योजना पूर्ण, तरीही पाण्यासाठी संघर्ष; प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.