
Chandrapur News: अवघ्या 7 महिन्यांत रस्त्याची दुरवस्था, नागरिकांनी व्यक्त केला संताप
“राममंदिर झाले, आता राष्ट्र…”; पुण्यातून RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
या रस्त्याचे काम सुरू असतानाच दर्जाबाबत अनेक संशय व्यक्त केले जात होते. सिमेंट, खडी आणि डांबराचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार सुद्धा केली होती. ‘हे काम योग्य पद्धतीने होत नाही, साहित्य निकृष्ट आहे आणि मानकांनुसार काम होत नाही,’ असे स्पष्ट नमूद करून तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र सदर तक्रारींना विभागाकडून गंभीरतेने घेतले गेले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची व तांत्रिक कारणे देत तक्रारींचा फडशा पाडला. कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण निकाली काढले. आज हाच रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून नागरिकांच्या त्या तक्रारी खऱ्या ठरल्या आहेत. अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली असती तर कोट्यवधी रुपयांचा निधी असा जीणं झाला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तालुक्यातील बहुतांश अधिकारी आज जनतेच्या सेवेत नाही, तर केवळ टक्केवारीच्या हिशेबात गुंतल्याचे कटू वास्तव समोर येत आहे. रस्ते, नाले आणि इतर बांधकामे निकृष्ट होत असताना हेच अधिकारी डोळेझाक करत आहेत. कारण त्यांच्या खिशात ‘कमिशन’ पोहोचत आहे. यांच्याच निर्धक्रयतेमुळे आणि संगनमतामुळे नवे रस्ते काही महिन्यांत उखडत आहेत, पण जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही, अशी संपप्त प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर
आज या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. दुचाकीस्वार, रुग्णवाहिका आणि शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली बांधलेला हा रस्ता जनतेसाठी ‘अपघातांचा सापळा’ ठरत असताना, जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कसलीही कारवाई न होणे हे आश्चर्यकारक आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रस्ता पुन्हा दर्जेदार पद्धतीने तयार करावा, अशी मागणी एटापल्ली-मवेली परिसरातील नागरिकांकडून होत आहे.