chandrashekhar bawankule give reasons why leader detach from thackeray group
छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष हे एकमेकांवर पराजयाचे खापर फोडत आहेत. शरद पवारांबाबत देखील ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी देखील पक्ष सोडून जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली आहे. याबाबत आता भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांचे स्वागत केले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आज संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रेवश झाला, महायुतीच्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मजबुत सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि संघटनेत दीड कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी घरोघरी जात आहे. ज्या ज्या ठिकाणी जात आहोत तिथला प्रत्येक व्यक्ती भाजपाचं सदस्यत्व मागत आहे, मोदी, फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आपल्याला पुढे नेईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकीकडे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असली तरी उद्धव ठाकरेंच्या गटाला गळती लागली आहे. राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. तर भास्कर जाधव हे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मत मांडताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिल्यामुळे काँग्रेस सारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे त्यांना अनेक कार्यकर्ते सोडून जात आहे, उद्धव ठाकरे यांनी मुळ भुमिकांशी तडजोड करायला नको होती, त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहायला मागत नाहीयेत, अशी भूमिका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे चंद्रशेखर बावनकुळे ठाकरे गटाबाबत म्हणाले की, “उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा देखील काही जास्त पक्ष सांभाळण्याचं काम झालं नाही. आम्ही चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षात पुन्हा संधी देणार आहे,” असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आहे. सामंत म्हणाले की,शिवसेना शिंदे गटात अनेक जण प्रवेश करीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे भास्कर जाधव शिवसेनेत आले, तर त्यांचे स्वागतच करू. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास कोकणात शिवसेनेची आखणी ताकद वाढेल.महायुतीत लढायचं आमचं धोरण आहे. पण स्थानिक लेव्हलला काही लोकांना वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत तर आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, असेही मत उदय सामंत यांनी म्हटले.