Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा; सत्ताधारी विरोधक आमने- सामने

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. मंजूर, नामंजूरच्या घाेषणा व विरोधकांचा गोंधळ यामुळे सभेत गदाराेळ झाला. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्यामुळे वातावरण तापले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 31, 2024 | 12:47 PM
कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा; सत्ताधारी विरोधक आमने- सामने
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. मंजूर, नामंजूरच्या घाेषणा व विरोधकांचा गोंधळ यामुळे सभेत गदाराेळ झाला. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्यामुळे वातावरण तापले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. सभेत दिवंगत नेते, जवान आणि दूध उत्पादक याना श्रद्धांजली वाहत असताना देखील विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. अध्यक्ष डोंगळे प्रास्तविक करत असताना महाडिक समर्थकांची हुल्लडबाजी सुरू होती.

शुक्रवारी दुपारी १ वाजता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाची ६२ वी सर्वसाधारण वार्षिक सभा सुरू झाली. सभा सुरु होण्यापूर्वीच महाडिक समर्थकांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सभेमध्ये सभासदांच्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात येतील, असे सांगितले होते. त्यासाठी सभासदांकडून प्रश्नही मागविण्यात आले होते. मात्र, महाडिक गटाकडून सभा सुरु होण्यापूर्वीच गोंधळ घालण्यास सुरुवात झाली.

पोलीस व कार्यकर्त्यांत धुमचक्री

संचालिका शौमिका महाडिक सभास्थळी येताच त्यांच्या समर्थकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांत धुमचक्री झाली. महाडिक यांच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तर आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी सतेज पाटलांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे जोरदार सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला.

बॅरिगेट्स तोडून सभास्थळी प्रवेश

शौमिका महाडिक यांना प्रवेश देण्यात आला. पण कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर जोरदार वादावादी झाली. बॅरिगेट्स तोडून महाडिक समर्थकांनी सभास्थळी प्रवेश केला. पोलिसांनाही त्यांना आवरणे अवघड झाले होते. दुसरीकडे सभास्थळी गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे स्वागतपर भाषण करीत होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बोगस दूध संस्था नोंदणी केली आहे. दुधाचे संकलन कमी झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Chaos in kolhapurs gokul meeting the ruling opposition faces each other nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • kolhapur

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
3

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.