Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा! गारगोटीतही महाडायलिसिस सेवा बंद, पुढे काय?

Kolhapur News: आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्यसेवेचा बोजवारा वाजला असल्याचं दिसून येत आहे. गारगोटीमध्ये महाडायलिसीस सेवा बंद झाली असून रुग्णांवर आता वणवण फिरायची वेळ आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 11, 2026 | 01:21 PM
कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातील डायलिसीस विभाग (फोटो सौजन्य - राजेंद्र पाटील)

कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातील डायलिसीस विभाग (फोटो सौजन्य - राजेंद्र पाटील)

Follow Us
Follow Us:
  • १,०६७ कोटींची थकबाकी , एचएलएल लाईफ केअरचा सेवा बंद करण्याचा निर्णय
  • कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केंद्रे ठप्प, मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांवर उपचारांसाठी वणवण भटकण्याची वेळ
  • गारगोटीत महाडायलिसिस सेवा बंद पडल्याने रुग्णांसमोर उपचारांचा प्रश्न झाला उपस्थित 
Kolhapur News / राजेंद्र पाटील: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कारभार नेमका कोणाच्या भरवशावर सुरू आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करणारी धक्कादायक परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यातच महा डायलिसिसची सेवा ठप्प झाली असून, विशेष म्हणजे आरोग्यमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या गारगोटी शहरातील डायलिसिस केंद्रही बंद पडले आहे. 

आरोग्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील आणि त्यांच्या शहरातील रुग्णांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असेल, तर राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार किती गंभीर अवस्थेत पोहोचला आहे, याची कल्पना येते. सरकारच्या मोठ्या गाजावाजात सुरू झालेल्या मोफत डायलिसिस सेवेचे तीनतेरा वाजले असून, मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या गोरगरीब रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

आर्थिक कोंडीचा फटका 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महा डायलिसिस, महालॅब आणि आपला दवाखाना या महत्त्वाकांक्षी योजनांना आर्थिक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. या सेवा पुरविणाऱ्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनीची राज्य सरकारकडे तब्बल १ हजार ६७ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी असल्याने कंपनीने राज्यभरातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा थेट फटका कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांनाही बसला आहे.

Gokul Election 2026 : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी 63 वर्षांनंतर चंदगडला मान, राजेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

आरोग्यमंत्र्यांच्या गारगोटीतच सेवा बंद , मग राज्यातील रुग्णांनी कोणाकडे पाहायचे?

या संपूर्ण प्रकारातील सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे राज्याचे सार्वजनिक आरोग्य खाते सांभाळणारे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील डायलिसिस केंद्रांवरच उपचार बंद पडले आहेत. गारगोटी हे आरोग्यमंत्र्यांचे वास्तव्याचे शहर. मात्र, याच गारगोटीतील डायलिसिस केंद्रातील सेवाही ठप्प झाली आहे. ज्या जिल्ह्यातून राज्याच्या आरोग्य विभागाचे नेतृत्व केले जाते, त्याच जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारांसाठी वणवण करावी लागत आहे.

रुग्णांच्या जीवाला धोका     

डायलिसिस हा मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी नियमित आणि अत्यावश्यक उपचारांचा भाग आहे. आठवड्यातून ठराविक वेळा डायलिसिस करणे रुग्णांच्या जगण्यासाठी महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत अचानक सेवा बंद झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसचा खर्च परवडत नसल्याने सरकारी मोफत सेवेवर अवलंबून असलेल्या गरीब रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

१,०६७ कोटींची थकबाकी , चार हजार कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीसोबत दहा वर्षांचा करार केला होता. या करारानुसार गेल्या सात वर्षांपासून राज्यात सुमारे ४०० महालॅब, २२५ आपला दवाखाने आणि ११० डायलिसिस केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जात होत्या. 

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून देयके मिळत नसल्याने कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. आर्थिक कोंडीमुळे कंपनीच्या चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. प्रयोगशाळांसाठी आवश्यक असलेले डायग्नोस्टिक किट्स, औषधे आणि अन्य साहित्य खरेदी करणेही कठीण झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Gokul Chairman Election 2026 : अजितदादांच्या राईट हॅन्डची ‘गोकुळ’ मध्ये बाजी! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड

सरकारच्या दुर्लक्षाची शिक्षा रुग्णांना का?

कंपनीने थकीत देयकांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अपेक्षित प्रतिसाद आणि निधी उपलब्ध न झाल्याने अखेर सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणाऱ्या मोफत आरोग्य सुविधांवरच गंडांतर आले आहे. 

महालॅबच्या माध्यमातून मिळणाऱ्या सीबीसी, थायरॉईड, बायोकेमिस्ट्री यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या, आपला दवाखान्यातील मोफत उपचार आणि डायलिसिस सेवा बंद पडल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य संकटात सापडले आहे.

सरकारने योजना मोठ्या थाटामाटात सुरू करायच्या, त्यांचा गाजावाजा करायचा आणि नंतर कंत्राटदारांची हजारो कोटींची देणी थकवून सेवा बंद पडू द्यायच्या, ही कोणती प्रशासन व्यवस्था? आर्थिक नियोजनातील अपयशाची किंमत सर्वसामान्य रुग्णांनी का मोजायची, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया नाहीच 

या गंभीर प्रकाराबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे खाजगी सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणावर आरोग्यमंत्र्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: Kolhapur news the mega dialysis service in gargoti has also shut down dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!
1

Gokul Chairman Election 2026 : कोण आहेत राजेश पाटील? अजितदादांचे विश्वासू आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून मैदानात!

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?
2

Gokul Chairmen Election 2026 : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी रस्सीखेच! सतेज पाटलांची आघाडी की महायुतीचा डाव यशस्वी? कोण होणार अध्यक्ष?

Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला!
3

Gokul गिळंकृत करण्याचा डाव? कोल्हापुरात मोठा संघर्ष पेटला!

Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली बंजारा बांधवांसोबत दिवाळी
4

Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली बंजारा बांधवांसोबत दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.