मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य सरकारने सुरू केलेल्या पहिल्या ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ वितरणाचा सोहळा सोमवारी मुंबईतील ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी एका भव्य समारंभात पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या “आनादी मी… अनंत मी…” या प्रेरणादायी गीताला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे गीत देशभक्ती, आत्मसाक्षात्कार आणि विचारशक्तीचे प्रतीक मानले जाते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.
Corona Update : कोरोना रुग्णांची संख्या १०४७ वर, ११ जणांचा मृत्यू; महाराष्ट्र-केरळ हॉटस्पॉट
राज्य सरकारने सुरू केलेल्या या पुरस्काराचा उद्देश समाजाला प्रेरणा देणाऱ्या गीतांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे हा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने रणजित सावरकर, आशिता राजे, स्वप्नील सावरकर, मंजिरी मराठे आणि अविनाश धर्माधिकारी यांनी या पुरस्कार समारंभास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.
“अनादी मी… अनंत मी…” हे गीत केवळ साहित्यिकदृष्ट्या नाही, तर वैचारिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि कर्मयोगाचे सार प्रकट करते. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी २ लाख रुपयांचा धनादेश सावरकर फाउंडेशनच्या प्रतिनिधींना सुपूर्द केला. स्मारकाच्या देखभाल, संवर्धन आणि विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी ही आर्थिक मदत प्रदान करण्यात आली आहे.
या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन केवळ एका योद्ध्याचेच नाही तर एका विचारवंत, निर्भय आणि साहित्यप्रेमी राजाचेही उदाहरण आहे. त्यांचे जीवन आपल्याला केवळ लढण्याची प्रेरणा देत नाही तर संस्कृती आणि विचारांचे जतन कसे करायचे हे देखील शिकवते.”
IAS Fauzia Tarannum: फौजिया तरन्नूम IAS आहेत की पाकिस्तानी…; भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
ते पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘अनादी मी, अनंत मी…’ हे गीत त्यांच्या आत्मविश्वासाचे, देशभक्तीचे आणि अमर विचारांचे प्रतीक आहे. अशा गीतांचा सन्मान करणे ही आपल्या सांस्कृतिक जबाबदारीचा एक भाग आहे. म्हणूनच राज्य सरकारने या गीताला पहिल्या प्रेरणा गीत पुरस्काराने सन्मानित केले आहे.”
या समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खर्गे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चावरे, अनेक अधिकारी, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्काराचे उद्दिष्ट समाजाला जागृत करण्याची, प्रेरणा देण्याची आणि संघटित करण्याची क्षमता असलेल्या गाण्यांना सन्मानित करणे आहे. हा पुरस्कार साहित्यिक, संगीत आणि सांस्कृतिक मूल्ये पुनर्संचयित करण्याचा एक प्रयत्न आहे जेणेकरून भावी पिढ्या त्यांच्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडल्या जातील.