फौजिया तरन्नूम IAS आहेत की पाकिस्तानी...; भाजप नेत्याचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकात भाजपचे विधान परिषद सदस्य (MLC) यांनी मुस्लिम आयएएस अधिकारी फौजिया तरन्नम यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करत त्यांच्यावर “पाकिस्तानी” असा उल्लेख केला आहे. या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, संबंधित नेत्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. फौजिया तरन्नूम या २०१४ च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असून त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३१ वा क्रमांक मिळवला होता. सध्या त्या कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्याच्या उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. संबंधित वक्तव्य भाजप नेत्याने एका रॅलीदरम्यान केले, ज्यामध्ये त्यांनी तरन्नूम यांच्याविषयी आक्षेपार्ह आणि धार्मिकतेवर आधारित टीका केली.
या प्रकारानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आयएएस असोसिएशननेही या वक्तव्याचा तीव्र निषेध करत, फौजिया तरन्नूम यांचे वर्णन एका “निष्पक्ष आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या अधिकारी” म्हणून केले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संबंधित नेत्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
भाजप नेते एन. रविकुमार यांनी कलबुर्गीच्या डीसी आयएएस फौजिया तरन्नूम यांच्यावर आरोप केला आहे की, ‘जिल्हा प्रशासन काँग्रेसच्या दबावाखाली काम करत आहे. डीसी कोणाचेही ऐकत नाहीत, काँग्रेस जे सांगते तेच त्या करत असतात, मला माहित नाही की त्या कलबुर्गी डीसी पाकिस्तानातून आल्या आहेत की इथल्याच आयएएस अधिकारी आहेत.
“… हा तर मुख्यमंत्री फडणवीसांचा राजहट्ट”; मुंबईच्या तुंबईवरून हर्षवर्धन सपकाळांची सडकून टीका
फौजिया तरन्नूम यांचा जन्म २ एप्रिल १९९२ रोजी बंगलोर, कर्नाटक येथे झाला. त्यांचे शिक्षण बंगलोरमध्येच झाले. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी टीसीएस (TCS) या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीत विश्लेषक (Analyst) म्हणून काही काळ काम केले.एका मुलाखतीत फौजिया यांनी सांगितले की, २०१० मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०११ मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा (UPSC) उत्तीर्ण केली आणि ३०७ वा रँक मिळवून भारतीय महसूल सेवा (IRS) पद मिळवले.
यानंतरच्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा दिली, मात्र रँकमध्ये अपेक्षित सुधारणा झाली नाही. तरीही, त्यांनी आपले प्रशिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले आणि त्यानंतर गावीच त्यांची पोस्टिंग झाली.यानंतरच्या प्रयत्नात त्यांनी २०१४ मध्ये यूपीएससीमध्ये ३१ वा क्रमांक मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये प्रवेश केला. सध्या त्या कलबुर्गी, कर्नाटक येथे उपायुक्त (DC) म्हणून कार्यरत असून, आपल्या कार्यक्षमतेसाठी आणि प्रामाणिक कामगिरीसाठी ओळखल्या जातात.
Pune Monsoon Update: पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा सविस्तर
फौजिया तरन्नूम यांनी २०१४ मध्ये पुन्हा एकदा युपीएससी नागरी सेवा परीक्षा (CSE) उत्तीर्ण करत ३१ वा अखिल भारतीय क्रमांक (All India Rank) मिळवला. याआधी त्यांनी २०११ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि भारतीय महसूल सेवा (IRS) मिळवली होती. मात्र, IRS अधिकारी म्हणून काम करताना त्यांना IAS आणि IRS या सेवांमधील कार्यप्रकृतीतील फरक प्रकर्षाने जाणवला.
एका मुलाखतीत फौजिया यांनी सांगितले की, “IRS सेवेत असताना मला जाणवले की IAS अधिकारी म्हणून मी अधिक प्रभावीपणे काम करू शकेन. त्यामुळे मी यूपीएससीचा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या पूर्ण पाठिंब्यामुळे परीक्षा दिली आणि उत्तम रँकसह IAS परीक्षा उत्तीर्ण केली. फौजिया तरन्नुम यांच्या कार्यशैलीसाठी त्यांची स्वच्छ आणि पारदर्शक प्रतिमा कायम राहिली आहे. कलबुर्गी जिल्ह्याच्या उपायुक्त म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये, त्यांना सार्वजनिक प्रशासनातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या या वर्षी गौरव मिळवणाऱ्या २२ अधिकाऱ्यांपैकी एक होत्या.