Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: निधी वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ; ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कोषागारात ५५० बिलांचा निपटारा!

छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोषागार कार्यालयात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत ५५० बिले सादर. ७३५ कोटींचा डीपीसी निधी १०० टक्के खर्च झाला असून निधी परत जाण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 01, 2026 | 02:34 PM
Chhatrapati Sambhajinagar: निधी वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ; ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कोषागारात ५५० बिलांचा निपटारा!
Follow Us
Follow Us:

 

  • निधी वाचवण्यासाठी प्रशासनाची धावपळ
  • ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कोषागारात ५५० बिलांचा निपटारा!
छत्रपती संभाजीनगर: आलेला निधी परत जाऊ नये, यासाठी आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी (३१ मार्च) जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांनी शेकडो कोटींची बिले कोषागारात सादर केले. शासनाकडून प्राप्त निधी अखर्चित राहू नये, निधी परत जाऊ नये यासाठी कोषागार कार्यालयात शेवटच्या क्षणापर्यंत बिले सादर करण्याची लगबग सुरू होती. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाचे कामकाज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते. शेवटच्या दिवशी कोषागार कार्यालयातून सुमारे साडेपाचशेहून अधिक बिले अदा करण्यात आल्याचे कोषागार कार्यालयातून सांगण्यात आले.

रात्री १२ नंतर सिस्टम ऑटोमॅटिक अपडेट होत असल्याने ११. ५९ वाजेपर्यंत बिले जमा करण्याचे काम सुरु होते. विविध सरकारी कार्यालयांना दरवर्षी विकास योजना व अन्य बाबींसाठी राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. हा निधी आर्थिक वर्ष संपण्याआधी खर्च करून त्याची बिले तसेच पगार, प्रवासभत्ता, वैद्यकीय प्रतिपूर्ती आदींची बिले कोषागार कार्यालयाकडे सादर करावी लागतात. ही बिले त्या त्या आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्च रोजी रात्री ११. ५९ वाजेपूर्वी सादर करावी लागतात. या क्षणापर्यंत बिले सादर न केल्यास शासनाकडून संबंधित विभागांना देण्यात आलेला निधी अखर्चित म्हणून तो परत घेतला जातो. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बिले सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही ही कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. मंगळवार हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सरकारी कार्यालयांकडून कोषागार कार्यालयाकडे बिले सादर केली जात होती. प्रत्येक कार्यालय, आपले बिल लवकरात लवकर जमा होईल यासाठी धावपळ करताना दिसून आले.

दरम्यान, कोषागार कार्यालयात आधी ऑडिटर, नंतर सुरवायझरकडून ही बिले तपासून झाल्यावर कोषागार अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन बिलांची रक्कम संबंधित यंत्रणांच्या खात्यावर जमा करण्यात आली. ३१ मार्च रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत सुमारे साडेपाचशेहून अधिक बिले सादर करण्यात आली. यांचा नेमका आकडा किती हे आज समजणार आहे.
जिल्हा नियोजन समितीचा सन २०२५-२६ मध्ये ७३५ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. शासनाकडून तीन टप्प्यात हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. हा निधी खर्च करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोलचा तुटवडा संपला, पण रिक्षाचालकांचे हाल कायम; एलपीजीचा तिढा अद्याप सुटेना!

बिले तपासून त्वरित अदा

८ आर्थिक संपत असल्याने दररोज सरासरी तीनशे ते साडेतीनशे बिले सादर होत होती. ही बिले तपासून त्वरित अदा करण्याची कार्यवाही करण्यात आली. गेल्या आठवड्यात शासकीय सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू होती. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी तेवढी गर्दी झाली नाही. मागील आठ दिवसापासून कोषागार कार्यालयाकडे बिलांचा ओघ वाढलेला होता.
– वैजनाथ शेळके, (वरिष्ठ कोषागार अधिकारी)

डीपीसीतील १०० कोटी अखर्चितसह पूर्ण निधी खर्च

दरम्यान, जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) शंभर टक्के म्हणजे ७३५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. डीपीसीतून जलसंधारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेला सुमारे शंभर कोटी रुपयांचा निधी मागील आठवड्यापर्यंत अखर्चिक होता. तो निधीही गेल्या चार दिवसात खर्च झाला आहे. संबंधित यंत्रणांनी विकास कामांची बिले सादर केल्यानंतर कोषागार कार्यालयाकडून हा निधी त्या त्या कार्यालयांना अदा करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे,

रात्री बारावाजेपर्यंत होती कामाची ‘लगबग’

दरम्यान, अखेरचा दिवस असल्याने रात्री १२ पर्यंत बिले स्वीकारण्याची मुभा होती. मात्र ठीक १२ वाजता सिस्टम ऑटोमेटिक अपडेट होत असल्याने बिले घेता येत नाही. यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालये आपली बिले वेळेत सादर होण्यासाठी लगबग करतांना दिसून येत होती.

Chhatrapati Sambhajinagar: आंतरजातीय विवाहानंतर छळ; 5 लाखांसाठी विवाहितेला मारहाण, घराबाहेर हाकलले आणि…

Web Title: Administration scrambles to save funds 550 bills cleared at the treasury by midnight on march 31st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ
1

Sambhajinagar Crime : माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर…; संभाजीनगरमध्ये विवाहितेचा छळ

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका
2

विनाहेल्मेट शासकीय कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक! १२ कार्यालयांसमोर कारवाई; ३०३ जणांना ३ लाखांचा दणका

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!
3

बजाज ऑटोच्या वाळूज प्लांटवर ‘कमवा अन् शिका’च्या विद्यार्थ्यांचे काम बंद आंदोलन; राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे!

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
4

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.