Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

दिवाळीच्या उत्सवात शहरात सर्वत्र आनंद आणि रोषणाईचे वातावरण असताना दुसरीकडे किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ले करण्याच्या आठ घटनांनी छत्रपती संभाजीनगर शहर हादरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 01:39 PM
ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर! आठ ठिकाणी चाकू, कोयते अन् लोखंडी रॉडने हल्ले

Follow Us
Follow Us:
  • फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित संघर्ष
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ ठिकाणी हल्ले
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. गुन्हेगारी रोखण्यालाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशातच आता दिवाळीच्या उत्सवात शहरात सर्वत्र आनंद आणि रोषणाईचे वातावरण असताना दुसरीकडे किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ले करण्याच्या आठ घटनांनी छत्रपती संभाजीनगर शहर हादरले आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

छावणीतील नेहरू पुतळ्याजवळ ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शेख अफ्फान शेख उमर यांच्या दुचाकीवर स्कुटीवरील तिघांनी फटाके फेकले. जाब विचारल्याने झालेल्या वादात शेख जाहीद यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सिडकोतील म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर येथे ऋषिकेश गणेश शेजुळ यांच्यावर राजन बाळू इंगोले, अभि उर्फ बॉबी मोरे, संजय जाधव उर्फ बंबई व साथीदारांनी हल्ला केला. राजनने चाकूने, तर बॉबीने कोयत्याने वार केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

मुकुंदवाडीतील पूर्व प्रकाशनगर येथे अरुण पडुळ यांच्या घरासमोर वाद झाला. यावेळी बॉबी मोरे याने अरुण यांच्या डोक्यात दगड मारला, तर राजन इंगोले याने त्यांच्या वडिलांच्या पोटात चाकू भोसकला. इतर साथीदारांनीही मारहाण केली. दुसऱ्या घटनेत तोरणागडनगरमध्ये मित्राला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या ऋतिक रवींद्र पाटील यांच्या डोक्यावर राजन इंगोले याने कोयत्याने वार केला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच परिसरातील संतोषिमाता नगरमध्ये चुलत बहिणीच्या अंगावर फटाका टाकल्याचा जाब विचारणाऱ्या १७ वर्षीय रोहित बावरीया याच्या गालावर सागर आठवले याने धारदार शस्त्राने वार केला. या घटनेचीही नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

सातारा परिसरात वाहनावर फटाका टाकण्याच्या वादातून योगेश आहेर याने रोहित संतोष गंगावणे याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. मध्यस्थी करणाऱ्या प्रथमेश नरवडे याच्या हातावर पियुष गडवे याने चाकूने वार केला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जवाहरनगरमध्ये फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. सनी निकाळजे, अभिषेक निकाळजे, सुनील निकाळजे यांच्यासह अन्य व्यक्तींवर मारहाण व दगडफेकीचे आरोप असून, सनीने चाकूने वार केल्याची तक्रार आहे. घाटी क्वार्टरमध्ये वाहनांजवळ फटाके फोडण्यास विरोध केल्याने दोन शेजारी कुटुंबांत वाद झाला. शेख शहाबाज याने सुमित रवींद्र सौदे यांच्या हातावर आणि बरगडीत चाकूने वार केले. या घटनेत महिलाही जखमी झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा  : पुणे शहरात 31 किमीचे दोन भुयारी मार्ग उभारण्याची तयारी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन

पोलिसांसमोर आव्हान

सणासुदीच्या काळात किरकोळ कारणांवरून धारदार शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई आणि गस्त अधिक प्रभावी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळीदरम्यान किती हल्ल्यांच्या घटना घडल्या?

    Ans: दिवाळीच्या काळात शहरात किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी रॉडने हल्ले करण्याच्या आठ घटना घडल्या.

  • Que: हल्ल्यांच्या घटनांमागे कोणती कारणे होती?

    Ans: फटाके फोडणे, वाहनांवर फटाके टाकणे, जाब विचारणे आणि किरकोळ वाद ही हल्ल्यांमागील प्रमुख कारणे होती.

  • Que: शहरातील कोणत्या भागांत हल्ल्यांच्या घटना घडल्या?

    Ans: छावणी, सिडको, मुकुंदवाडी, सातारा, जवाहरनगर आणि घाटी क्वार्टर परिसरात हल्ल्यांच्या घटना घडल्या.

Web Title: Several criminal incidents have taken place in chhatrapati sambhajinagar right during the diwali festival nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
1

लघुशंकेसाठी थांबला अन् गांजा विक्रीचा आरोप करत लुटले! PhonePe च्या व्यवहारातून दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या
3

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
4

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.