Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

भावाला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघालेल्या तरुणावर रस्त्यात अडवून चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरातील कामगार चौकात १० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 12:04 PM
पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

पोलिसांत तक्रार देण्यापूर्वीच तरुणावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • तक्रार देण्यासाठी जाताना तरुणावर चाकूहल्ला
  •  कामगार चौकात पोटात चाकू खुपसला
  •  पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता भावाला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे निघालेल्या तरुणावर रस्त्यात अडवून चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा परिसरातील कामगार चौकात १० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. हल्लेखोरांनी तरुणाच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर दुसरा वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, तरुणाने तो वार हातावर झेलल्याने पुढील अनर्थ टळला.

 

या प्रकरणी पाच जणांविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष कलाणी, राजसिंग संतोष कलाणी, धनराजसिंग संतोषसिंग कलाणी, सागर खरे आणि प्रेम खरे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. आकाश व्यंकट खरात यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आकाश हे बांधकाम ठेकेदार आहेत.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी आकाश यांचा लहान भाऊ कुणाल खरात हा दुचाकीवरून जात असताना राजसिंग कलाणी याने त्याच्या दुचाकीला कट मारला. याबाबत जाब विचारण्यासाठी कुणालने राजसिंगला मिलिंदनगर येथे थांबवले. तसेच दुचाकी हळू चालविण्यास सांगितले. याच कारणावरून राजसिंग, धनराजसिंग आणि संतोष कलाणी यांनी कुणालला शिवीगाळ करत मारहाण केली.

या मारहाणीत जखमी झालेल्या कुणालला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आकाश हे भावाला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते. मात्र, ते उस्मानपुरा येथील कामगार चौकात पोहोचताच संतोष कलाणी, प्रेम खरे आणि सागर खरे यांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर संशयितांनी आकाश यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. दुसरा वार करण्याचा प्रयत्न होताच आकाश यांनी तो हातावर झेलला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : Mumbai ला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी! महापौर कार्यालयासह विमानतळ, कोर्ट आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला निशाण्यावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाकूहल्ल्याची घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा परिसरातील कामगार चौकात १० नोव्हेंबर रोजी ही घटना घडली.

  • Que: चाकूहल्ला करण्यामागचे कारण काय होते?

    Ans: फिर्यादी आकाश खरात यांच्या भावाला दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण झाली होती. याच प्रकरणाची तक्रार देण्यासाठी जात असताना आकाश यांच्यावर हल्ला करण्यात आला.

  • Que: या प्रकरणी किती जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: संतोष कलाणी, राजसिंग कलाणी, धनराजसिंग कलाणी, सागर खरे आणि प्रेम खरे अशा पाच जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred in chhatrapati sambhajinagar where a young man was attacked with a knife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Arrested News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या
1

मोबाईलच्या हट्टापायी मुलाचे टोकाचे पाऊल; लोखंडी पाइपने वडिलांची केली हत्या

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
2

अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
3

दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार
4

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.