Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैजापूर पालिका निवडणुकीत ‘नातेसंबंधांची लढाई’! काका-पुतण्या, आत्या-भाची, बाप-बेटे रिंगणात; प्रचारासाठी फक्त ८ दिवस!

Vaijapur Municipality Election: शहरातील काही प्रभागांमधील नातलगांच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक। १ व मध्ये मसिरा शेख सुमैय्या शेख या अनुक्रमे भाजप-शिवसेनेच्या आत्या-भाचीमध्ये लढत होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 24, 2025 | 03:55 PM
वैजापूर पालिका निवडणुकीत 'नातेसंबंधांची लढाई'! (Photo Credit - X)

वैजापूर पालिका निवडणुकीत 'नातेसंबंधांची लढाई'! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • वैजापूर नगरपरिषद निवडणूक
  • नातेवाईकांमधील लढतींकडे मतदारांचे लक्ष
  • काका-पुतणे, आत्या-भाची, मावसभावांमध्ये रंगणार लढत
वैजापूर: वैजापूर पालिका निवडणुकीचा धुरळा सुरू झाला असून प्रचारासाठी अवघा आठ दिवसांचा कालावधी मिळणार असून उमेदवारांसाठी ‘करा किंवा मरा’ अशीच परिस्थिती आहे. शहरातील बहुतांश प्रभागात काका-पुतणे, मावसभाऊ, आत्या-भाची, सगेसोयरे अशा लढतींबरोरच बापबेटा, जावा-जावा, पत्ती-पत्नीही निवडणूक रिंगणात राहून आपले नशीब आजमावत आहेत. विशेषतः नातलगांच्या लढतींनी शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

वैजापूर पालिका निवडणुकीत ‘नातेसंबंधांची लढाई’!

पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कॉर्नर (कोपरा) सभा, बैठका सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशींसह शिवसेनेचे संजय बोरनारे व कॉग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड़ निवडणूक आखाड्‌यात उतरले आहेत. या पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहरातील काही प्रभागांमधील नातलगांच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक। १ व मध्ये मसिरा शेख सुमैय्या शेख या अनुक्रमे भाजप-शिवसेनेच्या आत्या-भाचीमध्ये लढत होत आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या झडताहेत फैरी !

विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी डॉ. दिनेश परदेशी व संजय बोरनारे या दोहोंतील सामना चुरशीचा होणार असून यानिमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून जोरदार ‘चिखलफेक’ सुरू आहे. ‘आम्ही शहरवासीयांसाठी काय केले?’ हे पटवून सांगण्यासाठी दोघांत स्पर्धा रंगली आहे. दोघेही इरेला पेटले असून एकमेकांविरुद्ध ‘राळ” उठविली जात आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण ऐन थंडीत चांगलेच ‘तापले’ आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Politics : वडगाव मावळमध्ये महायुतीमध्ये जुंपली; प्रचाराच्या तोफांमधून आमदार शेळकेंचा भाजपवर निशाणा

शहराच्या कट्ट्यांवर रंगताहेत राजकीय चर्चा जोरात

प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवे रियाज शेख व शिवसेनेचे मिरान शेख या काका-पुतण्याच्या लढतीकडे अख्ख्या शहराचे लक्ष वैधले आहे. ही लढत तुल्यबळ मानली जात आहे. हा प्रभाग म्हणजे दोघांचेही ‘होमपीच’ आहे. त्यामळे कुणाची सरशी होणार? याचाबत चर्चा झाडू लागल्या आहेत. यात काका म्हणजेच रियाज शेख हे माजी नगरसेवक असून ते राजकारणात चांगलेच मुरलेले आहे तर दुसरीकडे पुतण्या मिरान शेख नवखा असला तरी तो चांगली लढत देऊ शकतो. अशीही चर्चा आहे.

प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेचे हमीद कुरेशी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अकिल कुरेशी या मावसभावांचा सामना होत आहे. ही लढतही रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून डॉ. विजया डोंगरे व ज्योती डोंगरे या सख्ख्या जावा आमनेसामने नसत्या तरी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक आखाड्यात पदर खोचून उत्तरल्या आहेत. शिवसेनेचे सावेरखान व ताहेरखान हे बाप-बेटे, भाजपकडून प्रकाश चव्हाण चित्रा चव्हाण हे पत्ती-पत्नी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवित आहेत.

प्रभाग क्रमांक ११ आ मधून भाजपचे दशरथ बनकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) पुंडलिक गायकवाड या ‘सोव-याची’ मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. निवडणुकीत भाजप-राष्ट्र‌वादी काँग्रेस । अजित पवार) युती असली तरी येथे दोन्ही पक्षानी स्वतंत्र उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे, प्रभाग क्रमांक ७ व मध्ये शिवसेनेच्या ललिता सालुके व भाजपच्या सविता चहाण या नातलग उमेदवार पदर खोचून आमनेसामने उभे ठाकल्या आहेत.

हे देखील वाचा: मी स्टार प्रचारक कशाला हिशोब लागतोय; निवडणूक आयोगाबाबत बावनकुळे हे काय गेले बोलून? Video तुफान व्हायरल

Web Title: Battle of relationships in vaijapur municipal elections only 8 days left for campaigning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • Vaijapur

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! भारताकडून नेपाळ सीमा सील; आयात-निर्यातही बंद, येत्या 2 ते 5 मार्चपर्यंत…
1

मोठी बातमी ! भारताकडून नेपाळ सीमा सील; आयात-निर्यातही बंद, येत्या 2 ते 5 मार्चपर्यंत…

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय
2

Vaijapur News: वैजापुरात पाण्यावरून वादंग; ‘बोरदहेगाव’तून पाणी सोडण्यास विरोध केल्यानंतर स्थगितीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.