सटाण्याचा पाणी प्रश्न, भुयारी गटार योजना, यशवंतराव महाराजांचे स्मारक, रस्त्यांचा विषय, राष्ट्रीय महामार्गाची कामे, उद्याने, पर्यटन स्थळांचा विकास अशी कामे केली जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
शिवसेनेचे सर्व २० उमेदवार आणि नगराध्यक्षा ललिता गायकवाड निवडून नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावून सुरुवात करायचीय. आमदार मंजुळा गावित यांना १६०० कोटींचा विकास निधी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर अनेक पक्षांनी युती केली आहे. नांदेडमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस पक्षाची युती तुटली आहे.
Washim Municipality Election: प्रचारासाठीचा कालावधी मर्यादित असताना, सर्वच राजकीय पक्षांकडून 'विकासाच्या मुद्द्याला' हात घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Vaijapur Municipality Election: शहरातील काही प्रभागांमधील नातलगांच्या लढती रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक। १ व मध्ये मसिरा शेख सुमैय्या शेख या अनुक्रमे भाजप-शिवसेनेच्या आत्या-भाचीमध्ये लढत होत आहे.
काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. तरीही महाविकास आघाडी व्हावी, या दृष्टीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
Bawankule viral video : चंद्रशेखर बावनकुळे हे गडचिरोलीमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने गेले होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला द्याव्या लागणाऱ्या हिशोबाबाबत वक्तव्य केले.
वडगाव मावळमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अबोली मयुर ढोरे यांच्यासह सर्व 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत प्रचारयात्रेला प्रारंभ केला.
डगाव कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला.
छाननी, माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांसाठी अपक्षांचे उमेदवार हे मोठे 'डिसायडिंग फैक्टर' ठरणार, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे.
अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांनी भगूर नगरपालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. हिरामण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिका, इगतपुरीसाठी बैठकांवर जोर दिला आहे.
कंधारमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु उमेदवारी परत घेतलेल्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.
बहुतांशी यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती आघाडी अशी लढत राहिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सकल मराठा सेना पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्षपदाची लढत तिरंगी ठरली आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
चिपळूणमध्ये शिंदे गट-भाजपाची युती झाली. आ. शेखर निकम यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंतांशी चर्चेअंती नगराध्यक्ष पदासाठी भाजपने आपला अर्ज मागे घेतला.
अर्ज घेण्याचा काल शेवटचा दिवस होता आणि यावेळी निलंग्यात प्रचंड गडबड दिसून आली. अचानक वेगवेगळ्या घडामोडी पहायला मिळाल्या आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांची धामधूम सुरु झाल्याचे दिसून आले