Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. कचरा फेकून पळणाऱ्या एका दुचाकीस्वारावर छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून मनपाने ९० हजारांचा दंड वसूल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 19, 2026 | 03:14 PM
रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार

रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा !
  • सीसीटीव्हीतून शोध घेणार
  • मनपाच्या २९ पथकांची विशेष मोही
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या तसेच शहर विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेने आता थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधितांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. विशेष स्वच्छता मोहिमेत गुरुवारी २९ दक्षता पथकांनी ५००हून अधिक व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून ९० हजार रुपयांहून अधिक दंड वसूल केला.

दरम्यान, रस्त्यावर कचरा टाकून पसार झालेल्या एका दुचाकीस्वाराविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख व्यावसायिक भागात दर सोमवारी व गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता तपासणी व जनजागृती मोहीम राबविली जात आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २९६ अन्वये हॉटेल, उपाहारगृहे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांच्या स्वच्छतेची तपासणी केली जात आहे. मोहिमेदरम्यान ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याबाबत आहे.

मार्गदर्शन केले जात दुकानांसमोरील अस्वच्छता, सार्वजनिक ठिकाणी टाकलेला कचरा, बांधकामातील मलबा, रस्त्यांवरील अडथळे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईसोबत जनजागृती समुपदेशनावरही भर देण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले की, १६ जुलै रोजी झालेल्या विशेष मोहिमेत ५००हून अधिक व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमभंग करणाऱ्यांकडून ९० हजार रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला. या कारवाईनंतर व्यावसायिकांकडून कचरा थेट घंटागाडीत देण्याचे प्रमाण वाढले आहे.

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स हटवण्याचे आदेश

शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज व स्टँडी हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. संबंधितांनी हे फलक स्वतःहून हटवावेत; अन्यथा मनपामार्फत ते हटवून शहर विद्रूपीकरणाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

कचरा फेकून पळालेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

१३ जुलै रोजी रेल्वे स्टेशन ते बाबा पेट्रोल पंप मार्गावरील वॉकिंग प्लाझा परिसरात एका दुचाकीस्वाराने दोन पिशव्या कचरा रस्त्यावर फेकून पळ काढला. दक्षता पथकाने त्याचा पाठलाग केला; मात्र तो निसटला. उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी मोबाईलमध्ये टिपलेल्या छायाचित्राच्या आधारे दुचाकीचा क्रमांक (एमएच-२०-बीपी-३३०३) शोधून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, संबंधिताचा शोध सुरू आहे.

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Web Title: Dumping garbage on the street will lead to direct legal action offenders will be traced via cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.