Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Sambhajinagar News: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान म्हणजे शेतक-यांची थट्टाच असल्याची भावना व्यक्त करत साताऱ्यातील लोणंद (गोरेगाव) येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला

  • By anuradha sagar
Updated On: Oct 17, 2026 | 01:18 PM
Shashikant Shinde, NCP Sharad Pawar, Mahayuti, Drought Relief, Farmers News,

Shashikant Shinde, NCP Sharad Pawar, Mahayuti, Drought Relief, Farmers News,

Follow Us
Follow Us:
  •  ५,००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
  • ५ हजारांत दिवाळी साजरी करणे अशक्य
  • बाधित शेतकऱ्यांना १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५,००० रुपयांच्या मदतीची  मागणी
Sambhajinagar News: राज्यातील शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे उद्धवस्त झाला असताना, महायुती सरकारने जाहीर केलेली अवध्या ५ हजार रुपयांची मदत म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आणि त्यांना भीक दिल्यासारखा प्रकार आहे. एका बाजूला भीषण महागाईने उच्चांक गाठला आहे आणि दुसरीकडे संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे. अशा बिकट स्थितीत ५ हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते सोशल मीडियावरील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया लपवून निर्णयाचे गोडवे गात आहेत; मात्र प्रत्यक्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची थेट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी दुष्काळी धोरणांवर टीका केली.

London Protests: लंडनमध्ये आंदोलने! पार्लमेंट स्क्वेअरबाहेर भारत निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने, ध्रुव राठीचे समर्थक संघटित

पाऊसच नाही तर चारा कुठून येणार ?

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या दुष्काळी निर्णयाची पोलखोल करताना शशिकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चारा पिके घेण्याचा सल्ला दिला आहे. मुळात जमिनीत ओलावा नाही, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे आणि पाऊसच पडलेला नाही, तर चारा कुठून उगवणार? जमिनीवरची वस्तुस्थिती न समजता मंत्रालयात बसून कागदी सल्ले दिले जात आहेत.

कृषी सन्मान निधीचे चार हजार थकवले : रोहित पवार

दुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत देण्याची मागणी होत असताना राज्य सरकार केवळ पाच हजार रुपये देत आहे. त्यातच कृषी सन्मान निधीचे एप्रिलपासूनचे दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये प्रलंबित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्याऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली सरकार हातचलाखी करत असल्याची टीका त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून केली.

भंडाऱ्यात 18430 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पण 3698 आधार प्रमाणीकरण अपूर्ण

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले अनुदान म्हणजे शेतक-यांची थट्टाच असल्याची भावना व्यक्त करत साताऱ्यातील लोणंद (गोरेगाव) येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी जाहिर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पाच हजार रुपयांचा धनादेश शुक्रवारी टपालामार्फत पाठवला आहे.

सणासुदीच्या काळात खाद्यतेल, साखर, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाची दिवाळी साजरी कशी करावी? मुला-बाळांना नवीन कपडे कसे घ्यावेत? दिवाळीचा फराळ कसा करावा? असे प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरकारच्या मदतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

Web Title: How to celebrate diwali on 5000 rupees rohit pawars criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
2

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक
3

Marathwada Drought Impact : गेवराईचे जिनिंग धोक्यात, दुष्काळामुळे कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांची नोटीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.