
फोटो सौजन्य सोशल मिडिया
छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत जेएसडब्ल्यू’चा प्रकल्प बांधणी पूर्ण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी या प्रकल्पाचा वाटा मोठा असणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार असल्याने या प्रकल्पाकडून तरुणाईला आशा आहे. दरम्यान, जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी संभाजनगर प्रकल्पाला भेट देऊन अधिक माहिती घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत लवकरात लवकर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे.
Maharashtra Farmers: पाच हजारांच्या मदतीला कागदपत्रांचे ग्रहण! शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा आग्रह
यांनी जानेवारीपर्यंत बस आणि टूक या दोन्ही वाहनांचे उत्पादन प्रकल्पाच्या निर्धारित क्षमतेनुसार सुरू करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. यंत्रसामग्री सज्ज झाली आहे, आता उत्पादनाचा वेग वाढवा, अशा सूचना जिंदाल यांनी कामगारांना केल्या आहेत. प्रकल्पाच्या एकूण विकासाबद्दल तसेच संपूर्ण परिसरात राखण्यात आलेल्या स्वच्छता, सुव्यवस्था आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या ‘SS’ मानकांबद्दलही त्यांनी या भेटीत कौतुक केले. करण्याच्या सूचना केल्या. पायाभूत सुविधा तयार असून, आता अपेक्षित उत्पादन उद्दिष्टे गाठण्यावर संपूर्ण टीमने लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान त्यांनी पेंट शॉपमधील कामकाजाचीही पाहणी केली. यामध्ये पीटी/सीईडी प्रक्रिया तसेच बसच्या रोबोटिक पेंटिंग प्रक्रियेचा समावेश होता. या प्रक्रियांतून प्रकल्पातील आधुनिकउत्त्पादन तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षमतेचे दर्शन घडले. आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाच्या बळावर उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रीनटेकची टीम सज्ज झाली आहे. आता निर्धारित उत्पादन क्षमता गाठण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू आहे.