Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! ६ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची चित्रपटासारखी कथा

मुकेश गामेती हा युवक गेली सहा वर्षे भटकंती करत गुजरातमधून महाराष्ट्रात पोहोचला होता. ३ नोव्हेंबर रोजी भेंडाळा फाटा येथे झालेल्या अपघातात तो जखमी झाला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 21, 2025 | 02:55 PM
एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! (Photo Credit - AI)

एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • गुजरातमधून महाराष्ट्रात भटकंती करणाऱ्या तरुणाला डॉक्टरांनी दिली नवी ओळख
  • डॉक्टरांमुळे भेटला ‘देवमाणूस’
  • सामाजिक कार्यकर्त्यांमुळे झाली कुटुंबासोबत भेट
गंगापूर (वा.): एखाद्या चित्रपटाला शोभेल असे कथानक खऱ्या आयुष्यात घडले आहे, मुकेश लालजीभाई गामेती या युवकासोबत. गत सहा वर्षांपासून जो कुटुंबापासून दुरावला होता, तो एका अपघातामुळे अखेर आपल्या घरी परतला. सहा वर्षांनंतर आपल्या बेपत्ता भावाला सुरक्षित पाहून कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

अपघातानंतर उघडले नशिबाचे दार

मुकेश गामेती हा युवक गेली सहा वर्षे भटकंती करत गुजरातमधून महाराष्ट्रात पोहोचला होता. ३ नोव्हेंबर रोजी भेंडाळा फाटा येथे झालेल्या अपघातात तो जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तो बरा झाला, परंतु त्याची भाषा केवळ गुजराती असल्याने त्याच्या कुटुंबाची ओळख पटवणे रुग्णालयासाठी मोठी समस्या ठरली. वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतरही भाषेच्या अडथळ्यामुळे डिस्चार्ज प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. अखेर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मागितली, येथूनच या शोधमोहिमेचा नवा प्रवास सुरू झाला.

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Pune Air Service: छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता हवाई मार्गाने जोडले जाणार; ‘फ्लाय९१’ एअर सेवेची तयारी

डॉक्टरांमुळे भेटला ‘देवमाणूस’

डॉ. खंदारे यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते फैसल बासीलान यांनी गुजराती भाषा जाणकारांचा शोध सुरू केला. अखेर शहरातील अमजत पठाण यांच्या नातेवाईकांमार्फत आशेचा किरण दिसला. रहिमभाई उस्मानभाई खलीफा (सुरेंद्रनगर, गुजरात) हे तातडीने रुग्णालयात आले आणि त्यांनी मुकेशशी गुजराती भाषेत संवाद साधला. संवादादरम्यान मुकेशने आपले नाव मुकेश लालजीभाई गामेती आणि गुजरातमधील घरचा पत्ता सांगितला. त्यानंतर फैसल बासोलान यांनी रहिमभाईंच्या मदतीने गुजरात पोलीस आणि मुकेशच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

६ वर्षांनंतर घरी परतला मुकेश

मुकेश बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने त्याचा शोध घेतला होता, परंतु तो सापडला नाही. कोरोना काळात तो हयात नसेल, असे समजून कुटुंबीयांनी मनाची समजूत घातली होती. सर्व प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर, १९ नोव्हेंबर रोजी मुकेशचे भाऊ मन्नुभाई लालजीभाई गामेती, कालुभाई लालजीभाई गामेती आणि भावजयी अरुणाबेन तातडीने गंगापूरच्या रुग्णालयात दाखल झाले. सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या भावाला सुरक्षित आणि सुदृढ पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. डॉ. अभिजित खंदारे यांचे काटेकोर उपचार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ६ वर्षांनंतर या घरात पुन्हा आनंदाचा दिवा पेटला.

हे देखील वाचा: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे भाजीपाला कडाडला! ९० टक्के दर वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले

Web Title: Missing youth reunited with family after six years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • movie

संबंधित बातम्या

Weekend जाणार भारी! The Family Man 3 सह 7 जबरदस्त सिरीज-चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ; पाहा संपूर्ण यादी
1

Weekend जाणार भारी! The Family Man 3 सह 7 जबरदस्त सिरीज-चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ; पाहा संपूर्ण यादी

छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे भाजीपाला कडाडला! ९० टक्के दर वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे भाजीपाला कडाडला! ९० टक्के दर वाढले; गृहिणींचे बजेट कोलमडले

Chhatrapati Sambhajinagar Pune Air Service: छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता हवाई मार्गाने जोडले जाणार; ‘फ्लाय९१’ एअर सेवेची तयारी
3

Chhatrapati Sambhajinagar Pune Air Service: छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता हवाई मार्गाने जोडले जाणार; ‘फ्लाय९१’ एअर सेवेची तयारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट
4

छत्रपती संभाजीनगरमध्ये शंभर ‘पे अ‍ॅण्ड यूज’ शौचालये उभारण्याचे नियोजन; संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.