छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता हवाई मार्गाने जोडले जाणार (Photo Credit - X)
केंद्रीय नागरी उड्डूयण मंत्रालयाकडे वारंवार मागणी
छत्रपती संभाजीनगर टुरिझम डेव्हलपर्स फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमेटीच्यावतीने शहरासाठी आवश्यक पुणे विमानसेवा सुरू करण्याची केंद्रीय नागरी उड्डूयण मंत्रालयाकडे वारंवार मागणी केली आहे. कमेटीचे चेअरमन सुनील कोठारी यांनी लोहगाव येथील एअर कमोडोरकडे पाठपुरावा केल्यानंतर “पलाय ९१० विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. या कंपनीची एटीआर 71-600 विमान याद्वारे चिकलठाणा येथे दोनवेळा दाखल होईल.
नव्या सेवेसाठी स्लॉट उपलब्ध
छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर यासाठी स्लॉट उपलब्ध आहे. पण पुण्यातील लोहगाव विमानतळावर संभाजीनगरसाठी असा स्लॉट उपलब्ध नव्हता. पुणे विमानतळ संचालकांच्या नकारघंटेनंतर उदयोगजकांनी रेटा लावल्याने हवाईदलाने पुण्यात छत्रपती संभाजीनगरच्या फ्लाईटसाठी दिवसातून दोनवेळेस स्लॉट उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.
दैनिक नवराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब
दैनिक नवराष्ट्रने १२ नोव्हेंबर रोजी पुण्याची फ्लाईट सुरू करा, एअर इंडिया, इंडिगो यांच्यासह फ्लाय-९१, स्टार एअरकडे मागणीर या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करत रेल्वेने पुणे गाठण्यासाठी ७ ते ८ तास लागतात. शहरातून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होण्याबाबत प्रवासी, उद्योजकांनी केलेल्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याची दखल घेत ‘फ्लाय-९१, एअर सविर्वांकडून हिरवा कंदिल दिल्याचे संकेत मिळत आहेत.
माजी अध्यक्ष, एमसीसीआयएचे चेतन राऊत यांनी सांगितले की, पुण्यासाठी फ्लाय-११ है धिमान सुरू झाल्यास याचा उद्योजक, विद्यार्थी, नागरिकांना लाभव होणार आहे. रेल्वेने पुणे स्टेशन गाठताना ११ तास लागतात, तर अहिल्यानगर ते संभाजीनगर रस्त्याची दुर्दशा झाल्याने एसटी, खासगी वाहनांनी दीर्घ प्रवासाने नाकीनऊ येतात, तुलनेत ही विमानसेवा उपयुक्त राहील, इंडिगो, एअर इंडिया, फलाय-९१, स्टार एअरकडे पाठपुरावा केला आहे.






