माघी पौर्णिमेला मलंगडावर शिवसेनेकडून मोठा उत्सव साजरा केला जातो. यंदा 24 फेब्रुवारी मलंगड यात्रा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रे साठी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू केलं होती. गेल्या अनेक वर्षांपासून माघी पौर्णिमेनिमित्त मलंगडावर होणाऱ्या मलंग उत्सवात हजारो शिवसैनिक, भाविक हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट, जय मलंग श्री मलंग घोषणा देत सहभागी होत असतात. आता ही चळवळ चालू राहावी आणि मलंग गडाचा हक्क हिंदूंना मिळावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतला. आनंद दिघेनंतर दरवर्षी मुख्यमंत्री माघ पौर्णिमेला मलंग गडावर जाऊन मच्छिंद्र नाथांच्या समाधीचे दर्शन घेतात. त्यानुसार यावर्षी देखील 24 फेब्रुवारी रोजी ते यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. यावेळी मलंगगडावर कल दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. काही विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली होती. या संदर्भात खासदारांना विचारले असता अशा पद्धतीच्या घोषणा देणाऱ्यांवर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना दिल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या वारकरी महोत्सवात मलंग गड मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता मलंगडावरील यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
मलंगडावर काल झालेल्या घोषणाबाजी नंतर पोलिसांना कारवाई करण्याच्या खासदारांनी दिल्या सूचना…
काल एकादशीनिमित्त मलंग गडावर पालखी गेली असता मलंगडावर दोन गटामध्ये झालेल्या वादावादी आणि घोषणाबाजी नंतर विरोधात घोषणा देणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.