राहुल बजाज यांच्या निधनाने (Rahul Bajaj Passed Away) भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक (Ideal Of Youth Businessman) असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Reaction On Rahul Bajaj Death) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
[read_also content=”‘राहुल बजाज यांच्या निधनामुळे आपण एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी व्यक्त केलं दु:ख https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/governor-bhagatsingh-koshyari-comment-about-rahul-bajaj-nrsr-237115.html”]
राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.
राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.