Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्जमाघारीची मुदत उलटून गेल्यामुळे ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे कायम राहणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2026 | 02:24 PM
Pune Municipal Election 2026,

Pune Municipal Election 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारांचा भाजपमध्ये प्रवेश
  • चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश
  • भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून
Pune Municipal Election 2026: ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाला सुरूंग लागला आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील ठाकरे गटाच्या अधिकृत आणि बंडखोर उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या उमेदवारांनी पक्षप्रवेश केल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का असला तरी भाजपची मात्र ताकद वाढली आहे.

कोथरूड प्रभाग ९ मधील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार आणि पूजा सुतार आणि सुखदेव तापकीर यांनी भाजपात प्रवेश केला. तर प्रभाग क्रमांक ११ मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनीही आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.

Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत

चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे येथील आपल्या निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नूतन सदस्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “भाजपचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता या महत्त्वाच्या पक्षप्रवेशांमुळे भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. ही केवळ सुरुवात असून, आगामी काळात भाजप महापालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवेल,” असे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, अजय मारणे, अभिजीत राऊत यांच्यासह डॉ. संदीप बुटाला, प्रकाशतात्या बालवडकर तसेच इतर प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाच्या उमेदवारांनीच पक्षाला रामराम ठोकल्याने संबंधित प्रभागांमध्ये भाजपची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. या घडामोडींमुळे निवडणूक रणांगणात भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र स्पष्ट होत असून, महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vilasrao Deshmukh : लिहिलेले पुसता येतं, पण कोरलेलं नाही! वडिलांवर टीका करताच देशमुख बंधू आक्रमक

अर्जमाघारीची मुदत संपली; ईव्हीएमवर ठाकरे गटाची नावे

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर आता निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्जमाघारीची मुदत उलटून गेल्यामुळे ईव्हीएमवर ठाकरे गटाच्या उमेदवारांची नावे कायम राहणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांना संबंधित उमेदवारांच्या नावासमोर ‘मशाल’ हे चिन्ह आणि मतदानाचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

मात्र, प्रत्यक्ष प्रचाराच्या उर्वरित काळात वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. पक्षांतर केलेले उमेदवार मतदारांमध्ये “भाजपला मतदान करा, आमच्या नावासमोरील किंवा मशाल चिन्हापुढील बटण दाबू नका,” असे आवाहन करत प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, निवडणूक प्रचार अधिकच रंगतदार होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. अर्जमाघारीनंतर निर्माण झालेल्या या अनोख्या स्थितीचा निकालावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Pune municipal election 2026 pune municipal election 2026 major setback for thackeray sena in kothrud as ward 9 11 candidates join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • BJP Politics
  • chandrakant patil
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा
1

महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी सोडला पक्ष; BJP चा दावा

PCMC News: प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश
2

PCMC News: प्राधिकरणबाधित नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; शंकर जगतापांच्या पाठपुराव्याला मोठे यश

PMC Election 2026:  पुणे भाजपचे ‘संकल्पपत्र’ जाहीर: ४४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे गाजर?
3

PMC Election 2026: पुणे भाजपचे ‘संकल्पपत्र’ जाहीर: ४४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे गाजर?

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !
4

भाजपच्या ‘मिशन 125’ ला अजितदादांचा ‘खो’; धास्तावलेल्या मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील बड्या नेत्यांची कानउघडणी !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.