Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: मुंबईत ठाकरे ब्रँड की शिंदेंची सत्ता…; ‘त्या’ ६९ मतदारसंघांत मुंबईकर कोणाच्या बाजूने?

मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2026 | 09:56 AM
BMC Election 2026: मुंबईत ठाकरे ब्रँड की शिंदेंची सत्ता…; ‘त्या’ ६९ मतदारसंघांत मुंबईकर कोणाच्या बाजूने?
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत ठाकरे बंधुंची युती
  • एकनाथ शिंदेंना आव्हान
  • मुंबई महापालिकेचे गणित
BMC Election 2026: शिवसेनेचा जन्म मुंबईचा. मुंबईतच शिवसेना घडली, वाढली, फोफावली. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिला. अर्थात त्यात भाजपही होतीच. पण आता शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. पण संकटाच्या काळात मनसेरूपी भाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बँडच राहणार की, लोकसभा-विधानसभा-नगरपरिषद निवडणुकांमध्ये जोरदार स्ट्राईक रेट मारणाऱ्या एकनाथ शिंदेंची शिवसेना बाजी मारणार याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईतील ६९ मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे विरूदध एकनाथ। शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. या ६९ मतदारसंघातील जास्तीत जास्त जागा मुंबईकर कोणत्या शिवसेनेच्या परड्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Marathi Patrakar Din : जाणून घ्या ‘दर्पण’ ला सुरुवात करुन मराठी पत्रकारितेचा पाया रचणाऱ्या महापुरुषाबद्दल

उद्धव ठाकरेंना मनसेचे बळ

लोकसभा आणि विधानसभेत उयाठाकडून गददार, खोके सरकार अशा प्रकारची टीका करून शिंदेसेनेला हिणविण्यात आले होते. महापालिकेत मात्र हा सूर तेवढ्या प्रमाणात आळवलेला दिसून येत नाही. तसेच यावेळी महाविकास आघाडी देखील एकत्र नाही. काँग्रेसने आपली स्वतंत्र चूल मांडली आहे. पण राज ठाकरे सोबत आल्याने चाकरे ब्रेड एकत्र आला असून, उद्धव ठाकरेंना मनसेचे बळ मिळणार आहे. राज आणि उद्धव पहिल्यांदाच निवडणुकीत एकत्र आले आहेत.

मुंबई महापालिकेचे गणित वेगळे

मुंबई महापालिकेव्या २२७ जागांपैकी भाजपा-१३७, शिवसेना शिंदे ९०. शिवसेना ठाकरे- १६३, मनसे- ५३ अशा जागा लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ मोठा असतो. तसेच महाविकास आघाडी देखील भक्कम होती. त्यामुळे त्यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारली होती. पण विधानसभेत चित्र थोडे बदलले. ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना असा १० मतदारसंघात सामना झाला, त्यातील ७ जागा ठाकरे सेनेने जिंकल्या होत्या, महापालिका मतदारसंघांचे गणित वेगळे असते. अनेकदा उमेदवाराला पाहूनही मतदान होते. एकनाथ शिंदेंनी ९० मतदारसंघात आपली ताकद अजमावली आहे.

मनसेची राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती

मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे. हिंदुत्व आणि मराठी या दोन्ही मुद्यांना एकत्र करत भाजपा आणि शिंदेसेना प्रचारावर जोर देत आहे. उद्धव ठाकरेंच्या मागे २५ वर्षांची ‘अँटी इन्कम्बन्सी’ असली तरी मनसेसारखा नवीन फ्रेश भिडू त्यांनी सोबत घेतला आहे.

पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला

ठाकरे बंधूंची मुंबईत एकच सभा : राऊत

मुंबई, मुंबईत ठाकरे बंधूंची एकच भव्य आणि निर्णायक सभा शिवतीर्थावर होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चाना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. राऊत यांनी स्पष्ट केले की, अनेक लहान-मोठ्या सभा घेण्याऐवजी शिवतीर्थावर एकच दणदणीत आणि प्रभावी सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीबाबत चर्चा

कल्याण-डोंबिवली येथे सभेबाबत चर्चा सुरू असून, नाशिकमध्येही दोघे एका व्यासपीठावर येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. याशिवाय संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे स्वतः स्वतंत्र सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभांना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Bmc election 2026 bmc election 2026 thackeray brand vs shinde sena who will win mumbais 69 wards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका
2

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

“माझी लढाई मुस्लिमांशी नाही…; बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
3

“माझी लढाई मुस्लिमांशी नाही…; बुरखा घातलेली महिला मुंबईची महापौर होण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ
4

Shivsena Vachannama: AIIMS च्या धर्तीवर केईएम रुग्णालय अद्ययावत करणार! बाळासाहेबांच्या नावाने खुले करणार विद्यापीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.