Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूणमध्ये पिस्तूल आणि ४१ राउंडसह परप्रांतीय तरुणाला अटक

दरवाजा उघडताच पोलिसांनी नीरजवर झडप घातली आणि रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४१ राउंड आढळून आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 09, 2023 | 11:06 AM
चिपळूणमध्ये पिस्तूल आणि ४१ राउंडसह परप्रांतीय तरुणाला अटक
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : चिपळूण येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४१ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला मुद्देमालसह अटक करून गुन्हा दाखल केला आहे. नीरज सिंह हिरा बिस्त (वय २१) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

चिपळूण मधील वालोपे परिसरात एका तरुणाकडे विनापरवाना पिस्तुल असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. मिळालेली माहिती सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे पुढील नियोजन करून कार्यवाहिला सुरुवात केली होती. सबधितांला किंवा त्याच्या बरोबर रूम मध्ये राहणाऱ्याला कोणताही सुगावा लागू नये याची पूर्ण काळजी घेत पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले.

बुधवारी दुपारी १२ वाजता रवींद्र शिंदे यांच्या बरोबर एपीआय साळोखे, संजय पाटील, पीएसआय अरुण जाधव, पंकज खोपडे, पूजा चव्हाण, हेड कॉस्टबेल, पाटील, शेटकर, दराडे, थेट वालोपे येथील माऊली अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. येथील एका रूममध्ये नीरज हा दरवाजाला आतून कडी लावून असल्याचे पोलिसांना समजताच रुमच्या बाहेर पूर्ण सापळा लावून तसेच सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

दरवाजा उघडताच पोलिसांनी नीरजवर झडप घातली आणि रूमची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीत गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर आणि तब्बल ४१ राउंड आढळून आले. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल ताब्यात घेऊन नीरज सिंह बिस्ता याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही पिस्तुल त्याने कोणाकडून घेतली होती? आणि कशासाठी बाळगली होती? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले असून त्यावरून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Chiplun crime case ratnagiri crime case maharashtra police chiplun police ratnagiri police maharashtra government village made pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2023 | 11:06 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.