Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Walmik Karad : CID चे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडविषयी दिली मोठी माहिती; म्हणाले, ‘फरार आरोपी…’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सीआयडीचे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 31, 2024 | 08:49 PM
पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ

पोलीस कोठडीत रवानगी होताच वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली, ऑक्सिजनवर मास्क लावण्याची वेळ

Follow Us
Follow Us:

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. या प्रकरणात ज्याचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं ते वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आले आहेत. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सीआयडीचे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्या शरणागतीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Suresh Dhas : ‘दीड कोटीसाठी ‘आका’ने माणसं पाठवली अन् पुढे घडून बसलं’; सुरेश धस यांच्या दाव्याने राज्यात पुन्हा खळबळ

काय म्हणाले सारंग आव्हाड?

आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी एफआयआर नंबर ६३८/२०२४ मधील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाला. त्याला पुणे सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करुन त्याला बीडकडे रवाना करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मिक कराडसोबत आमच्या टीमसह बीडचे तपास अधिकारीही आहेत. बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता बंदोबस्तात बीडकडे त्याला रवाना करण्यात आलं आहे, पुढची तपासणी गुजर हेच करतील. सीआयडीचे डीवायएसपी आहेत त्यांच्या ताब्यात फरार आरोपीला देण्यात आलं आलं आहे, अशी माहिती सारंग आव्हाड यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते वाल्मिक कराड?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप होत असलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आरोप केले जात असून जर पोलीस तपासात दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं असतं. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाचा मला वाटत नाही की, फार काही फायदा पडेल. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही. त्याचं समर्थनही करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधकांनी राजकारण करत राहावं. आमची भूमिका मात्र स्पष्ट आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Web Title: Cid officer sarang awhad said walmik karad surrender in pune santosh seshmukh case beed crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 08:09 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ
1

Beed Crime: लग्नात मानपान कमी, ‘स्कॉर्पिओ’साठी 10 लाखांची मागणी; विवाहितेचा अमानुष छळ

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
2

Beed Crime News : विलास घुले हत्या प्रकरणात कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन; पोलिसांचे कारवाईचे आश्वासन

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात
3

Beed Crime: बीडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; सावकारी परवाना देण्यासाठी 13 हजारांची लाच घेताना तिघे जाळ्यात

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
4

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.