'दीड कोटीसाठी 'आका'ने माणसं पाठवली अन् पुढे घडून बसलं'; सुरेश धस यांच्या दाव्याने पु्न्हा खळबळ
Suresh Dhas On Walmik Karad : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस सातत्याने आरोप करत आहेत. दरम्यान वाल्मिक कराड यांनी आज पुण्यात पोलिसांसमोर सरेंडर केलं. वाल्मिक कराड सरेंडर होताच सुरेश धस यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत.”दोन कोटी रुपयांच्या खंडणीतील 50 लाख रुपये आधी पोहोचले होते. उर्वरीत दीड कोटीसाठी ‘आका’ने माणसं पाठवली होती. अन् पुढं घडून बसलं”, असा दावा सुरेश धस यांनी केल्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.
Who is Walmik Karad: परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?
सुरेश धर पुढे म्हणाले की, ‘आका’ आता शरण आले आहेत. शंभर टक्के 120 (ब) कट करणेमध्ये येतील. व्हिडिओ काॅल असेल, तर ते 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये येऊ शकतात”. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ कोटीच्या खंडणीतील 50 लाख पोचले होते. राहिलेल्या पैशासाठीच माणसं पाठवण्यात आली होती. ही माणसं ‘आका’नेच पाठवली होती. पुढे काय होऊन बसलं, सर्वांनाच हादरून सोडलं”, असा दावा त्यांनी केला आहे.
वाल्मिक कराड यांनी आपल्याला राजकीय हेतूतून या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. त्यावर सुरेश धस म्हणाले, “राजकीय हेतूचा आरोप आता जुना उद्योग झाला. राजकारण्यांनी सांगितले होतं का? संतोष देशमुखला मारा. हा उद्योग कोणी सांगितला होता”, अस सवाल करत आॅक्टोबर 2023 ला अशीच घटना पाटोदामध्ये घडली होती. त्यामुळे परळी पॅटर्न आमच्या तालुक्यात आणू नका, असे म्हणत हा प्रकार हाणून पाडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
संपत्ती जप्त केली त्यामुळेच वाल्मिक कराड सरेंडर झाले. आता खंडणी, मोकाका, अपहरण हे गुन्हे आहेतच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकाकामध्ये चौकशी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर कारवाई व्हावी, पुढे संशयित म्हणून खुनाच्या गुन्ह्यात देखील वर्ग करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली केल्याचं त्यांनी सांगितलं.
Walmik Karad : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड निकटवर्तीय मानेले जातात. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर मी बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांचा विषय आहे. मी एक छोटा आमदार आहे. आतापर्यंत मी ‘आका’च्या ‘आकां’वर मी बोललो नाही. त्यांच्या पक्षाचे नेते बोलले आहेत. तपास आणि चार्टशीट दाखल होईपर्यंत ‘आका’च्या ‘आकां’ना बिनखात्याचे मंत्री करावं, असं त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकी म्हणाले आहेत.
तसंच या गुन्ह्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. यासंदर्भात उद्या सकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावं, अशी माझी मागणी आहे. नक्षल जिल्हा, राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरूम चोर यांना सरळ करण्यासाठी फडणवीस यांनी पालकमंत्री व्हावं, अशी मागणी धस यांनी केली आहे.