
अतिरिक्त कर आकारणीमुळे नगरपरिषदेवर धडक मोर्चा
यवतमाळ: यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेने चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकन केले असून त्याबाबतच्या नोटीस नागरिकांना पाठवल्या आहेत. यात मनमानी पद्धतीने कर आकारणी झाल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. सोमवारी (दि. ३) याबाबत न्याय मागण्यासाठी नागरिकांनी पालिकेवर धडक दिली. दारव्हा येथील मोठ्या प्रमाणात मनमानी करवाढी विरोधात नगर परिषद दारव्हा येथे गेले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नगर परिषद सभागृहात सर्व नागरिकांसमोर प्रशासनाची बाजू मांडली. त्यांनी आक्षेप आल्यानंतर सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.
त्यामुळे उपस्थित नागरिकांचे समाधान झाले नाही. करवाढ, वॉर्ड क्रमांक, भोगवटदार, मोहल्ला, काही नागरिक यांची करवाढ तिप्पट, चौपट तर दहापटपर्यंत वाढली असल्याचे पुरावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात आले. अॅड. राजेश जाधव, हरिश जाधव, अशोक जयसिंगपुरे, डॉ. मनोज राठोड, रवी तरटे, मुनगिलवार, अजिंक्य निमकर, प्रा. सुरेश निमकर, गजानन देऊळकर, मनोहर नवरंगे, कृष्णा निवर्ते, किशोर घेरवरा आदींनी नागरिकांच्या वतीने बाजू मांडली. यावेळी नागरिकांनी कराच्या नोटीसेसची होळी केली.
लाजवणारी अतिरिक्त कर आकारणी
मोठ्या शहरांना लाजवेल अशी कर आकारणी दारव्हा नगर परिषेकडून केल्या जात आहे. पण सुविधेबाबत नगरपरिषद गंभीर नाही. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन पोहोचली नाही. रोड खोदून तसेच पडले आहे. नाल्याचे बांधकाम महिनोनमहिने सुरूच आहे. पूर्ण शहरात सिमेंट मिश्रित धूळ पसल्याने मोठ्या प्रमाणात धुळीच्या त्रासाने सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे दमा, खोकला, सर्दीचे रूग्ण वाढत आहे. नगर परिषदेची शिक्षण व्यवस्था २० वर्षे पूर्वीची कायम आहे. नगरपरिषदेने चांगल्या दर्जाच्या सुविधा उघडल्या नाहीत.
करवाढीत समोर, सुविधांमध्ये मागे
नगर पालिकेने कराबाबत ११ नोव्हेंबरपर्यंत आक्षेप स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. पण पूर्व इतिहास पाहता आक्षेपावर सुनावणीच होत नसल्याचे अशोक जयसिंगपुरे यांनी म्हटले आहे. शहरात सुविधा पुरविण्याबाबत पालिका प्रशासन गंभीर नाही. मात्र करवाढ करण्यात पुढे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मोठ्या शहरात ५०० चौरस फुटपर्यंत घरपट्टीत सूट दिली जाते. महिला व ज्ये नागरिकांनाही सूट दिली जाते. या ठिकाण कर भरमसाट, सुविधांमध्ये ठणठणाट असल्याचे अशोक जयसिंगपुरे म्हणाले नवीन कर प्रणालीमुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली असून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवून कर प्रणालीविरोधात आंदोलन करण्याबाबत शहरात बैठकीचे सत्र चालू करण्यात आले आहे.
यवतमाळच्या अडेगावात जागेच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; डोक्यावर वार करून केलं जखमी