जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविक वर्षभरापासून आतुरतेने गणरायाची वाट पाहतात. आता प्रत्यक्षात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मनीष जयवंत शिरफुले याने त्याचा लहान भाऊ दिनेश शिरफुले याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद केला.
पोलिसांच्या चौकशीत आयकार्डच्या बेल्टवरून मृत यवतमाळ येथील अणे महाविद्यालातील असल्याचे समोर आले. त्यावरून धामणगाव रेल्वे येथील कर्मचारी खसाळे यांनी महाविद्यालयात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
इमरान खान हा सलमान खान याच्या घराजवळ राहणारी हसीना बी शमशेर शाह यांना उधारीवर दिलेले पैसे परत मागण्यासाठी घटनेच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान आला होता. त्याचवेळी इमरान खान मोठमोठ्याने आवाज देऊन शिवीगाळ करीत होता.
विमल महामुने या आपल्या परिवारासोबत धाराशिव येथून प्रयागराजला महाकुंभमेळ्यात गेल्या होत्या. कुंभमेळ्यातून परत आर्णी मार्गे धाराशिवकडे जात असताना आर्णी तालुक्यातील सुकळीजवळ भीषण अपघात झाला.
खंडाळा घाटातील मोठी मारवाडी फाटाच्या आसपासच्या परिसरात पुसदवरून वाशीम मार्गे जात असलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने रंजना या ऑटोरिक्षातून खाली पडल्या, असे बोलले जात आहे. याप्रकरणी आरोपी ऑटोरिक्षाचालक रहेमत रहिम खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
समुपदेशक घटस्फोटासाठी आल्यावर पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. हा कालावधी संपेपर्यंत पती-पत्नी वेगळे होऊ शकत नाहीत. अनेकदा लग्नानंतर काही दिवसांनी घटस्फोटाची याचिका दाखल केली जाते.
सुधाकर यांचा मुलगा गणेश पेटकर (30) याने फावड्याने रामदास यांच्यावर वार केला. यात रामदास यांच्या बोटाला दुखापत झाली. तर सुधाकर याने हातातील सळईने रामदास यांच्या डोक्यावर वार केला.
महिलेने आडाओरड करून आपल्या पतीला आवाज दिला. तेव्हा पतीसह आरडाओरड ऐकून शेजारी तेथे आले असता, आरोपी पळून गेला, अशी तक्रार पीडितेने दराटी पोलिस स्टेशनला दिली.