Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला, प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक हैराण

वाई शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचे मनमानी पार्किंग आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे वाईकर नागरिक सध्या प्रचंड त्रस्त झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 01:11 PM
वाई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला, प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक हैराण

वाई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला, प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:
  • वाई शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चिघळला
  • प्रशासनाचे दुर्लक्ष
  • नागरिक हैराण
वाई : वाई शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांचे मनमानी पार्किंग आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे वाईकर नागरिक सध्या प्रचंड त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थित कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही. विशेष म्हणजे, वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ तीन ते चार वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाहनसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत अपुरी असल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्थानिक नागरिकांच्या मते, किमान दहा ते पंधरा वाहतूक पोलिसांची तातडीने आवश्यकता आहे.

 

दरम्यान, शहरात मालवाहू ट्रक व इतर अवजड वाहनांकडून रस्त्यांवरच माल चढ-उतार केला जात आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. अनेक वाहनचालक कुठेही, कधीही आपली वाहने उभी करून निघून जातात, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. या बेजबाबदार वर्तनामुळे वाहतुकीचे पूर्णपणे तीन तेरा वाजल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नेतेही या गंभीर प्रश्नावर मौन बाळगून असल्याचे दिसत आहे. राजकारणात व्यस्त असलेल्या नेत्यांकडून शहराच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.

वाई नगरपालिकेतील नगरसेवकांनीही या प्रश्नावर ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. वाहतुकीच्या समस्येबाबत एकाही नगरसेवकाने प्रभावीपणे आवाज उठवलेला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करून वाई शहरासाठी अधिक वाहतूक पोलीस, योग्य पार्किंग व्यवस्था आणि शिस्तबद्ध वाहतूक नियोजन यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाईकर नागरिकांचा एकच सवाल आहे की या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा नेमका कधी निघणार?

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत नराधमाचे अनैसर्गिक कृत्य; कोर्टाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

Web Title: Citizens are suffering due to traffic congestion in wai city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Traffic
  • Traffic Police
  • Vai News

संबंधित बातम्या

सायन-बीकेसी कनेक्टरचा मोठा दिलासा; वडाळा ते बीकेसी प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत
1

सायन-बीकेसी कनेक्टरचा मोठा दिलासा; वडाळा ते बीकेसी प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.