Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलकापुरातील पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा; ५० दिवसांत उपाययोजनांचे प्रशासनाकडून आश्वासन

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ नागरिकांनी पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. युवा नेते ओम शिंदे यांच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात महिला, युवक आणि विविध क्षेत्रांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 18, 2026 | 08:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मंगळवारी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. युवा नेते ओम शिंदे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनातून नूतन विद्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. महिलांसह युवक-युवती आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शहराच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले.

सीएसआर निधीच्या प्रभावी वापरासाठी राज्यात ‘स्टेट सीएसआर’ कक्ष उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वाढती लोकसंख्या, नव्याने विस्तारलेल्या वसाहती आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरात प्रथमच कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा किंवा व्यासपीठ न वापरता केवळ नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करून नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सहभागी झाले.

ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. पाणीटंचाईमुळे घरगुती कामांपासून दैनंदिन जीवनापर्यंत अनेक अडचणी निर्माण होत असल्याने प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चा नगर परिषद कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले आणि निवेदन सादर करण्यासाठी शिष्टमंडळाला आत जाण्याची परवानगी देण्यात आली.

यानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधींची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करून सुधारणा करण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच यासंदर्भात लेखी आश्वासनही आंदोलकांना देण्यात आले.

Matheran News : माथेरानच्या शार्लोट तलावात कोट्यवधींचा गैरव्यवहार? गाळ न काढताच निधी लाटण्याचा आरोप

प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी निश्चित मुदतीत परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा नेते ओम शिंदे यांनी दिला. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये आणि पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मलकापूरमधील हा पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा शहरातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारा ठरला असून, आता प्रशासन ५० दिवसांच्या आश्वासनानुसार कितपत प्रभावी पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens non partisan protest march against water scarcity in malkapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
1

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
2

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात
3

Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
4

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.