Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांच्या संमतीशिवाय कार्यवाही करु नका, अन्यथा…; कर्वेनगरमधील SRAच्या सर्वेक्षणावरुन राष्ट्रवादीचा इशारा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे क्षेत्राच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2025 | 04:20 PM
नागरिकांच्या संमतीशिवाय कार्यवाही करु नका, अन्यथा...; कर्वेनगरमधील SRAच्या सर्वेक्षणावरुन राष्ट्रवादीचा इशारा

नागरिकांच्या संमतीशिवाय कार्यवाही करु नका, अन्यथा...; कर्वेनगरमधील SRAच्या सर्वेक्षणावरुन राष्ट्रवादीचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • सर्वेक्षणामुळे कर्वेनगरमधील नागरिक नाराज
  • स्वप्निल दुधाने यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
  • सकारात्मक विचार करण्याची केली मागणी
पुणे : पुण्यातील कर्वेनगर भागातील वडार वस्ती आणि श्रमिक वसाहत येथे कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले. या अचानक केलेल्या सर्वेक्षणामुळे परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. यावरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. तसेच नागरिकांच्या संपूर्ण संमतीविना कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये, अशी विनंती दुधाने यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.

 

दुधाने म्हणाले, नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच विश्वासात न घेता बेकायदेशीर सर्वेक्षण करण्यात येत होते. यावेळी अधिकारी वर्ग पोलीसांसह उपस्थित असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रागाच्या संमिश्र भावना दिसून आल्या. यावेळी नागरिकांचा रोष ध्यानात घेता अधिकारी वर्गाने काढता पाय घेतला असला तरी नागरिकांतील असंतोष कमी झालेला नाही.

याबद्दल आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके आणि त्यांच्या अखत्यारीत कार्यरत असणाऱ्या उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी अधिकारी अर्चना यादव यांची भेट घेतली आणि सदर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी नागरिक सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून, त्यांचा सदर उपक्रमास विरोध आहे. यामुळे नागरिकांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी नागरिकांच्या संपूर्ण संमतीविना कोणतीही कार्यवाही केली जाऊ नये, अशी मागणी दुधाने यांनी केली आहे.


यावर सकारात्मक विचार न झाल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही दुधाने यांनी दिला. याप्रसंगी अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासन यावर योग्य ती कार्यवाही करेल, असा विश्वास वाटतो. नागरिकांच्या या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत असून त्यांच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध असू, यात शंकाच नाही, असंही दुधाने यावेळी म्हणाले.

Web Title: Citizens of karvenagar have expressed displeasure over the survey conducted by sra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • Karvenagar
  • MP Sharad pawar
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.