Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : सततच्या वाहतूक कोंडीवर ठाणेकरांना दिलासा; धूळ आणि ध्वनी प्रदूषणापासून रहिवाशांची मुक्तता

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. नरेश म्हस्के यांनी दखल घेत नागरिकांचा प्रश्न मार्गी लावला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 15, 2025 | 04:54 PM
Thane News : सततच्या वाहतूक कोंडीवर ठाणेकरांना दिलासा; धूळ आणि ध्वनी प्रदूषणापासून रहिवाशांची मुक्तता
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे स्नेहा जाधव,काकडे : ठाणे- बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे मुल्लाबाग येथील  ठाणे-बोरिवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानत सत्कार केला.

ठाणे- बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील पाच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता. रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रहिवासी आणि एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती.  बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेयर बेल्टवरून नेण्यात येणारा राडारोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

भरगच्च भरलेल्या सभागृहात गेली अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती. आम्ही अडचणीत असताना नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे आमच्या मदतीला धावून येतात. प्रश्न कोणताही असो ते नेहमीच  योग्य आणि रहिवाशांच्या बाजूने तोडगा काढतात. विरोधी पक्षाच्या नेत्याने कितीही आवई उठवली, कितीही उर बडवून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी येथील रहिवासी सुज्ञ आहे, अशी भावना यावेळी अनेक रहिवाशांनी व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या रेट्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशी जिंकले आहेत. रहिवाशांचे अभिनंदन करत आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

नितीन लांडगे, आशुतोष सिरोलकर, राकेश मोदी, सिद्धार्थ पांडे, गौतम दिघे, केतन खेडेकर, जयंत धाणे, सुनील भिडे, प्रसन्न मुजमदार, मदुरेश सिंग, नितीन सिंग, शरद वारस्कर, दीपक पांडे, पल्लवी सेठ, तारक मोदी, निवृत्ती गावंडे, दीपक मल्होत्रा, टोनी सिंग, प्रल्हाद बोरसे, नीता कलोरे  पल्लवी शेट्ये, कल्पना वोरा आणि रहिवाशांचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर आभार मानले.

Web Title: Citizens thank naresh mhaske for new tunnel on thane borivali road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • Thane news

संबंधित बातम्या

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
1

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत
2

Dombivali News : झोपेत असाताना झाला सर्पदंश; चार वर्षीय चिमुकली आणि मावशीचा हृदयद्रावक अंत

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण
3

जागतिक हृदयदिन विशेष, एक पाऊल आरोग्याकडे; फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात हृदयविकारावरील उपचारातील महत्त्वपूर्ण सादरीकरण

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात
4

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.