
E20 Janta Party Campaign 2026, Anti E20 Petrol Movement India, E20 Fuel Policy Social Media Protest
E20 Janta Party: दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या यशस्वी आंदोलनाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एका नव्या मोहिमेची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटर एक्स आणि इन्स्टाग्रामवर ‘E20 जनता पार्टी’ नावाने एक नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे CJP प्रमाणे ही मोहीमदेखील लोकप्रिय होत असून, E20 इंधन धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा दावा या मोहिमेद्वारे केला जात आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे 20 टक्के मिश्रण असलेल्या E20 इंधनाच्या वापराच्या धोरणाला देशभरातून विरोध होत आहे. E20 धोरणाला यापूर्वीही विरोध करण्यासाठी विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. आता त्याच मुद्द्याला सोशल मीडियावर नवे व्यासपीठ मिळाले असून ‘E20 जनता पार्टी’ या नावाने स्वतंत्र मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेसाठी X आणि इन्स्टाग्रामवर अधिकृत खाती सुरू करण्यात आली असून, E20 इंधनाच्या संभाव्य परिणामांबाबत जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
E20 जनता पार्टीची सोशल मीडिया खाती सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार, X वरील खात्याला 22 हजारांहून अधिक, तर इन्स्टाग्रामवरील खात्याला 30 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे ही मोहीम सोशल मीडियावर वेगाने चर्चेचा विषय ठरत आहे.
E20 इंधन धोरणाच्या समर्थन आणि विरोधात सोशल मीडियावर विविध मतप्रवाह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर E20 जनता पार्टीच्या मोहिमेकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, या मोहिमेमुळे E20 इंधन धोरणाबाबत सार्वजनिक चर्चेला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशात CJPकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तब्बल ३५-४० दिवसांच्या आंदोलनानंतर प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता देशात E20 ची जनता पार्टीची मोहीम सुरु झाली असून देशात E20 पेट्रोलल विरोध केला जात आहे. “आमच्या गाड्यांवर प्रयोग करणे थांबवा, भारतीय नागरिकांना त्यांच्या गाड्यामध्ये कोणते पेट्रोल टाकायचे. याचा अधिकार मिळाला पाहिजे. आमची वाहने ही वेगवेगळ्या चाचण्यासाठी नाहीत. आम्ही कष्ट करुन आणि कर भरून आमची वाहने घेतली आहेत.” असं म्हणत E20 जनता पार्टीने E20 इंधनाला कटोर विरोध केला आहे.
Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी
वाहने बनवणाऱ्या कंपन्यांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे. तेच इंधन ग्राहकांना उपलब्ध करून द्यावे. सामान्य नागरिकांना कोणतेही इंधन किंवा तंत्रज्ञान वापरण्याची सक्ती करू नये. ग्राहकांना आपल्या पसंतीचे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या E20 जनता पार्टीकडून प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.