फोटो सौजन्य- pinterest
पावसाळ्याच्या सुरुवातीला दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळी धरणातील पाणीसाठ्याने ७३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. अवघ्या आठवडाभरात पाणीसाठ्यात जवळपास २० टक्क्यांची भरघोस वाढ झाल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट आता बऱ्याच अंशी दूर झाले आहे. यंदा लांबलेला पाऊस आणि परिणामी धरणाने गाठलेला तळ पाहता बारवी धरण भरण्याचा प्रवास अत्यंत संथ आणि चढ-उतारांचा राहिला. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८ जुलै रोजी २४७.८० मिमी.
एकीकडे बारवी धरण क्षेत्रात पाऊस सुरू असतानाच, दुसरीकडे उल्हास नदीच्या उगम क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. रायगड जिल्ह्यात आणि कर्जत-नेरळ पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता बदलापूरमध्ये उल्हास नदीची पाणीपातळी १४.३८ मीटर इतकी नोंदवली गेली. नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असल्याने सुरक्षित पातळीवर वाहत असली, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास पातळीत आणखी वाढ होईल.
धरणाने थेट ४४ टक्क्यांवर झेप घेतली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. १० ते १५ जुलै या काळात पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्याने धरण ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर रेंगाळले होते. १६ जुलैला धरणाने कसेबसे ५० टक्के गाठले, १९ जुलै रोजी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने साठा ५४.२३ टक्क्यांवर पोहोचला, त्यानंतर मात्र गेल्या सात दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने अक्षरशः धडाका लावला असून, साठ्यात थेट १९.३५ टक्क्यांची मोठी उसळी घेत रविवार २६ जुलै रोजी सकाळी हा साठा ७३.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
बारवी धरणातून अंबरनाथ बदलापूर, उल्हासनगर महापालिका, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी, तळोजा एमआयडीसी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी बारवी धरण महत्त्वाचे मानले जाते.
धरणातील पाणीसाठा ५० टक्केपर्यंत पोहोचण्यास १४ जुलै उजाडला. १९ जुलैनंतर मात्र पावसाचा वेग काहीसा वाढत असल्याने धरणाच्या पाण्यात समाधानकारक वाढ झाली आहे. १९ जुलैपर्यंत धरणात ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. २१ जुलैला त्यामध्ये वाढ होऊन तो ५७.४१ टक्क्यांवर तर २२ जुलैला ५९.२४ टक्के व २३ जुलैला ६८.१० टक्क्यांवर पोहबला. आणि २६ जुलैला त्यामध्ये आणखी वाढ होऊन तो ७३.५८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात ८५.२५ टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा काहीसा कमी आहे. परंतु पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
Ans: रविवारी सकाळपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्के नोंदवण्यात आला आहे.
Ans: बारवी धरणातून अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ठाणे एमआयडीसी आणि तळोजा एमआयडीसी परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
Ans: मागील वर्षी याच कालावधीत धरणात 85.25 टक्के पाणीसाठा होता. यंदा तो कमी असला तरी अलीकडील पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.






