
MC Election 2026, BMC Election Result 2026,
“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?
भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या या कार्यकत्यांचे दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. दोन्ही बाजूनी भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या कार्यकर्त्याला फटकावत होते, त्याच्या थोबाडीत मारण्यात आल्या. या कार्यकर्त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हिसकावून घेण्यात आला, त्यानंतर भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिंदे सेनेच्या था कार्यकर्त्याला गळा आवळला. मात्र, शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता कसाबसा निसटून भाजपच्या कार्यकर्त्यांशी एकटाच लढत होता, मला मारु नका, असे तो वारंवार बजावत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सांगली महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान जोरदार राडा झाला आहे. हा राडा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला, मिरज येथे पैसे वाटप सुरू होते. या पैसे वाटपावरून राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इंद्रिस नायकवडी आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून देखील गेले, यामुळे मिरजमध्ये तणावाचे वातावरण होते.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, लातूरच्या गांधी चौक पोलिस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हे दाखल झाले आहे. काँग्रेसने भाजपावर पैसे वाटपाची तर भाजपाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. यामुळे लातूरमध्ये चांगलाच राडा निर्माण झाला होता. या प्रकाराने भाजपा-काँग्रेसचे पदाधिकारी आमने-सामने येत चांगलाचा गोंधळ घातला. प्रकरणी महेंद्र प्रदीप हांडे यांच्या फिर्यादीवरीन संजय वसंत गीर, अजीत पाटील व अदिती अजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
संजय गीर यांनी अजित पाटील व अदिती पाटील यांच्या सांगण्यावरून प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपा उमेदवार अदिती अजित पाटील यांना मतदान करण्यासाठी मतदारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे प्रलोभन दाखवून पैसे देत असल्याचा आरोप केला आहे. फिर्यादीने पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकार त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुंदर पाटील याना सांगितला. यावेळी आरोपी संजय गीर यास त्याच्याकडील काळी बैंग दाखविण्याची विनंती केली असता, आरोपीने मी कोणाचा माणूस आहे हे तुम्हाला माहीत नाही का, माझे लोक बोलावून तुम्हाला जिये मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.