
"मला जुना संजय पाटील व्हायला लावू नका"; सांगलीच्या एका कार्यक्रमात आजी-माजी खासदारांमध्ये हमरीतुमरी, प्रकरण काय?
सांगली: लोकसभा निवडणूक संपून विधानसभा निवडणुक आली, मात्र अद्याप आजी माजी खासदरांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. तासगाव नगरपालिक प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात कार्यक्रमाच्या मांचावरच जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा चांगलीच चर्चेत आली. महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची ऊमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर कॉँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक होते. त्यानंतर विशाल पाटील अपक्ष लढले. त्यानंतर विशाल पाटील हे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.
तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कामांवरून श्रेयवाद रंगला आहे, नुकतेच केंद्रीय नितीन गडकरी यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना तासगवच्या स्थानिक आमदारांच्या मागणीवरून रिंगरोड साठी १७८ कोटी मंजूर केले असल्याचे सांगितले, तर माजी खासदार यांच्याकडून यासाठी आपण गेले दहा वर्षे पाठपुरावा केला असल्याचे सांगितले गेले, याच वादाचे आणि गेल्या काही दिवसांपासून आजी माजी खासदारांच्या सुरू असणारा वाद आज पुन्हा पाहायला मिळाला.
विशाल पाटील यांनी त्यांच्या भाषणात गडकरी साहेब यांनी रोहित पाटील यांना निरोप द्या, ” तुमच्या रिंगरोडचे १७८ कोटी मंजूर केले असल्याचे मला सांगितलं असल्याचा उल्लेख केला.” स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असून देखील भाजपकडून व पालकमंत्री यांच्याकडून चांगला निधी विकासकामांसाठी दिलाय, यामध्ये कुठंही राजकारण नाही यांचा आनंद असल्याचे सांगितले.
यानंतर भाषणात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांना सुनावले, ” तुम्ही काल खासदार झालाय, माझे आणि गडकरी यांचे जुने संबंध आहेत, मान देऊन बोलवलं आहे, इथं येऊन नौटंकी करू नका, असं बोलले, त्यावर विशाल पाटील यांनी देखील उठून जोरदार प्रतिउत्तर दिले. मी तुमचा भाषणात अपमान केला नसल्याचे त्यांनी सांगितलं.