
सांगली सर्वात चांगली, म्हणून आम्ही भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करत आहोत
Sangli News : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, भाजपचा राज्यातील प्रचाराची सुरुवात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली, यावेळी त्यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवा निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अश्वसन दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल भोसले, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज देशमुख, नितीन शिंदे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, समित कदम, शेखर इनामदार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते, सांगली सर्वात चांगली, म्हणून आम्ही भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून करत आहोत. सांगलीत आजपर्यंत अनेक कामांना निधी दिला, १०५ कोटी पाणीपुरवठा योजनेसाठी, ७९ कोटी घनकचरा व्यवस्थापनासाठी, १५ कोटी रुपये शाहू महाराज मार्गासाठी, ३ कोटी काळीखन सुशोभीकरण करण्यासाठी, २५३ कोटी मलनिस्सारण प्रकल्पासाठी, ६० कोटी एलईडी पथदिवे लावण्यासाठी असे कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे, भाजपचा झेंडा फडकवा आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
* सांगलीत आय.टी. पार्क देऊन शहराचा विकास करू
* वारणा उदभव योजना राबाबवून शहराला स्वच्छ पाणी
* कवलापूर विमानतळ पूर्ण करु
* सांडपाणी व्यवस्थपन प्रकल्प
* एचटीपी प्रकल्प
Maharashtra Politics: वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीला यश; ‘या’ जिल्ह्यात १६१ उमेदवारांची माघार
मुख्यमंत्री म्हणाले, सांगली आणि मिरज शहराला महापुराच्या पाण्याचा दरवर्षी फटका बसतो, यातून हजारो कोटींचे नुकसान होते, म्हणून वर्ल्ड बँकेशी चर्चा करून महापूर परिवर्तन ( फ्लड डायव्हर्शन ) साठी ४ हजार कोटी मंजूर केलेआहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५१९ कोटींची कामे लवकरच सुरू होत आहेत, महापुराचे पाणी दुष्काळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ” गेल्या सत्तर वर्षात गावाकडे चला म्हणून सांगण्यात आले, आणि जास्तीत जास्त विकास कामे ग्रामीण भागात केली गेली, मात्र आता शहराकडे चला म्हणून विकास कामे शहरात जास्तीत जास्त करण्याचे आम्ही ठरवले आहे, देशाच्या एकूण जीडीपी पैकी ६५ टक्के शहरातून येतो, शहरे रोजगार तयार करतात, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही शहरे विकासावर विशेष लक्ष दिलं आहे.”