
Clashes between transgenders and police at Sant Rohidas Vidyamandir polling station Kagal News
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर आगर शहरातील संत रोहिदास विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी आणि पोलिसांमध्ये न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलल्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. तसेच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिला यानंतर पोलिसांनी संबंधित राजकीय पक्षांच्या उमेदवार प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या बाहेर काढले.
हे देखील वाचा : भाजपवर टीका करुन शहाजी बापू पाटील फसले? चौकशीचा ससेमिरा अन् विरोधकांचे टीकास्त्र
या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार, करवीर विभागाचे पोलीस उपधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी भेट दिली, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. किरकोळ प्रकार वगळता सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
तब्बल नऊ वर्षांनी जिल्ह्यातील या १३ ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, मलकापूर, पन्हाळा, पेठ वडगाव, हुपरी ,हातकलंगले, जयसिंगपूर ,शिरोळ ,कुरुंदवाड, कागल, मुरगुड आदी ठिकाणच्या या निवडणुका होत आहेत . कागल नगर परिषदेमध्ये एका केंद्रावर किरकोळ वादावादीची घटना घडल्याची समोर आली आहे. तर हातकणगले नगरपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये मशीन बंद पडलेली घटना घडली आहे .या व्यतिरिक्त जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू असले तरी चुरस पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली या निवडणुकीच्या अनुषंगाने ३१८ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. कागल नगरपरिषद निवडणुकीत संत रोहिदास विद्यामंदिर या शाळेच्या मतदान केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . उमेदवार असलेले या केंद्राच्या प्रवेशदारावर उभे आहेत याबाबत हस्तक्षेप घेण्यात आला त्यानंतर गोंधळात वातावरण निर्माण झाले यावर तृतीयपंथ त्यांनीही आपल्यावर अन्याय होत आहे इतर पक्षाचे उमेदवार आत बसून आहेत आणि आम्ही मात्र बाहेर उभारलो आहे अशी तक्रार करण्यात आली याचा जाब पोलिसांना विचारला तर तृतीयपंथी उमेदवाराच्या डिजिटल बोर्डवर लिंबू फेकण्यात आला. तर विविध ठिकाणी नारळ फोडण्यात आले असा आरोप या तृतीयपंथीकडून करण्यात आला होता याबाबत कार्यकर्त्यांनी पोलीस यंत्रणेला जाब विचारला आमच्या जीविताला धोका आहे आम्हाला प्रचारापासून देखील रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला यानंतर तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीसागर यांनी संत रोहिदास केंद्राला भेट देऊन पाहणी केली व या वादावर पडदा पडला. सध्या सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.