खासदार संजय राऊत यांच्या शिंदे गट फुटण्याच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Eknath Shinde : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असून राजकीय (Political News) नेत्यांनी तुफान टोलेबाजी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला. महायुतीमधील मित्रपक्ष हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यामुळे महायुतीच्याच नेत्यांमध्ये जुंपली असल्याचे दिसून येत आहे. यावरुन शिंदे गट फुटणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपवर मागील काही दिवसापांसून टीका करणाऱ्या शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर आज छापा मारण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘चौकशी होईल, त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही’ असं सांगितलं. शहाजी बापू पाटील हे राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे खळबळ उडाली. शहाजी बापू पाटील यांनी भाजपा विरोधात भूमिका घेऊन सातत्याने टीका करण्याचा धडाका लावला होता. शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर पैसे लाटण्याचा देखील आरोप केला.
हे देखील वाचा : निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल
एकाच हॉटेलमध्ये असून देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली नाही. त्यावर “मी अगोदर आलो होतो, मुख्यमंत्री नंतर आले. पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत. फोनवर आमची चर्चा होत असते. आमची चर्चा रोज चालू असते” असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “आरोप-प्रत्यारोप मी आणि मुख्यमंत्र्यांनी केलेत का? ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. स्थानिक प्रश्न वेगळे असतात, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. डेव्हलपमेंटवर आमचा प्रचार सुरू आहे” असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार असल्याचा दावा केला. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची शिवसेना बोलायला आम्ही तयार नाही त्यांचा कोथला अमित शहा काढणार लिहून घ्या त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता.शिंदेंचे 35 आमदार फुटणार. रवींद्र चव्हाण यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून यासाठी नेमणूक त्यासाठीच केलीये. त्यांना वाटतं दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी पण ते कोणाचेच नाहीत. शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे अमित शहाने निर्माण केलेला गट आहे. यांनी कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. यावर एकनाथ शिंदे यांनी एक्शनने प्रतिक्रिया दिली.
हे देखील वाचा : माणुसकी हारली! समोर सुरक्षा रक्षक कोसळला तरी जे पी नड्डा देत राहिले भाषण, व्हिडिओ आला समोर
संजय राऊत यांनी 35 आमदार फुटणार असा दावा केला, त्यावर एकनाथ शिंदे यांनी ‘हात जोडले आणि हसले, त्यानंतर मी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा देतो” एवढीच त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच निवडणुका प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाहीत. पण यावेळेस निवडणुका थांबवल्या गेल्या, त्यावर मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कधीही निवडणूक अशा पद्धतीने थांबवल्या जात नाहीत. पण दुर्देवाने तशी घटना घडली आहे. त्याची मी माहिती घेतो” असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.






