Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Dudh Sangh News: गोकुळमध्ये सत्तेचे बदलणार समीकरण? हसन मुश्रीफांचा ‘मास्टरस्ट्रोक’ की मित्रपक्षांची कोंडी?

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्याच्याकडे जितके ठराव, त्याला तेवढ़या जागा हा फॉर्म्युला पुढे केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार वचर्चा आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Mar 04, 2026 | 10:09 AM
Gokul Dudh Mahasangh Election 2026, Gokul Dudh Sangh Kolhapur, Gokul Election 2026, Bombay High Court Kolhapur Circuit Bench

Gokul Dudh Mahasangh Election 2026, Gokul Dudh Sangh Kolhapur, Gokul Election 2026, Bombay High Court Kolhapur Circuit Bench

Follow Us
Follow Us:
  • यावेळच्या निवडणुकीत मतांपेक्षा ‘ठरावांच्या’ ताकदीला जास्त महत्त्व आले आहे.
  • गोकुळच्या एकूण ५ हजार ४७० सभासदांमध्ये यंदा १ हजार २०० नव्या सभासदांची भर पडली आहे.
  • मुश्रीफ गटाच्या वाढत्या प्रभावामुळे महायुतीतील इतर नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
Gokul Dudh Mahasangh Election 2026:  गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत यंदा मतांची नव्हे, तर ठरावांची तलवार म्यानातून बाहेर आली आहे. ५ हजार ४७० सभासदांच्या या भव्य रणांगणात तब्बल १ हजार २०० नव्या सभासदांची भर पडल्याने सत्तेचा खखेळ अधिकच रंजक झाला आहे. विजयासाठी किमान २ हजार ८०० मतांची गरज असली, तरी प्रत्यक्षात सध्या ठराव हेच खरे गेमचेंजर ठरत आहेत.

१५० ठरावांमागे १ उमेदवारी; मुश्रीफांचा मास्टरस्ट्रोक?

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्याच्याकडे जितके ठराव, त्याला तेवढ़या जागा हा फॉर्म्युला पुढे केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार वचर्चा आहे. प्रत्येक १५० ठरावांमागे एक उमेदवारी या समीकरणामुळे महायुतीतील पारंपरिक सरसकट जागावाटपावा फॉर्म्युला धुळीस मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. २५ संचालक पदांसाठी लढत होत असताना, कोणत्याही पॅनेलला निर्णायक आघाडी घ्यायची असेल तर किमान १४०+ ठरावांची भक्कम साखळी उभी करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या संचालकपदाचे इच्छुक ठसवधारकांव्या दारात ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे.

Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक

महायुतीत अस्वस्थता; मुंबई दरबारात हालचाली

महापालिका नगरपालिका पद्धतीप्रमाणे समान वाटा मिळावा, यासाठी महायुतीतील काही नेते मुंबई पातळीवर लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. मात्र, मागील पाच वर्षांत वाढलेल्या सभासदांमध्ये मुश्रीफ गटाचे ठराव लक्षणीय असल्याने त्यांचा वरचष्मा स्पष्ट दिसत आहे. (Kolhapur Politics)

महाडिक, मंडलिक, नरके, आबिटकर गटावर दबाव

पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या महाडिक गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. धनंजय मंडलिक, नरके आणि प्रकाश आबिटकर गटालाही ठरावांच्या गणितात पिछाडीवर पडण्याची भीती सतावत आहे. ठरावांची ताकद हा मुद्दा पुढे करत मुश्रीफांनी महायुतीतील इतर नेत्याना कोडीत पकडल्याचा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

मतपेटीपेक्षा ठरावांची पेटी ठरणार जड

गोकुळची निवडणूक ही मतांपेक्षा ठरावावर अवलंबून असल्याने पुढील आठ दिवसांत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे, महायुती एकदिलाने रणांगणात उतरणार की ठरावांच्या फॉर्म्युल्यावरून अंतर्गत धुसफूस उफाळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूणच, ‘गोकुळ’व्या या निवडणुकीत मतपेटीपेक्षा ठरावांची पेटी जड तरणार हे स्पष्ट झाले आहे, ज्याच्या गळ्यात ठरावांची माळ, त्याच्याच कपाळावर यंदा विजयाचा गुलाल उडणार, अशीच राजकीय चर्चा रंगली आहे,

 

Web Title: Gokul dudh mahasangh election 2026 power equation latest news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • Gokul Milk
  • Kolhapur Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.