Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “धूल चेहरे पे थी, आइना साफ़…”; फडणवीसांचा ‘मविआ’ला जोरदार चिमटा

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. तसेच शेवटच्या काही वेळात मतदानाची आकडेवारी वाढली असा आरोप केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 19, 2024 | 04:20 PM
तुम्ही पण एक दिवस मुख्यमंत्री होणार'; खुद्द CM देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

तुम्ही पण एक दिवस मुख्यमंत्री होणार'; खुद्द CM देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Nagpur Winter Session 2024: राज्यात महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये राज्यातील जनतेने महायुती सरकारला संपूर्ण बहुमत दिले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधकांना झालेला पराभव, ईव्हीएम आणि अनेक गोष्टींवरून टोले लगावले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. तसेच शेवटच्या काही वेळात मतदानाची आकडेवारी वाढली असा आरोप केला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विरोधक करत आहेत. या सर्व आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले, “विरोधकांनी जनतेने दिलेला निकाल खुल्या मनाने स्वीकारावा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही, तोवर तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील.” यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेरोशायरी करत विरोधकाना टोला लगावला आहे.

LIVE | Replying in Legislative Assembly to discussion on Hon Governor’s address..
मा. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर…
🕝 2.30pm | 19-12-2024📍 Vidhan Bhavan, Nagpur.#Maharashtra #Nagpur #WinterSession2024 https://t.co/WDF4S4y78N — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024


‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आइना साफ़ करता रहा’,
अशा ओळी विधानसभेत ऐकवत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.  जोपर्यंत तुम्ही तुमचा चेहरा साफ करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी खोचक टोला लगावला.

मोकळ्या मनाने जनादेश स्वीकारावा – फडणवीस

निकाल आपल्या बाजूने आला की सर्व काही चांगले. विरोधात निकाल आला तर ईव्हीएमवर आरोप करायचे. ईव्हीएमवर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते. मात्र तिथे सिद्ध करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष गेला नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल तुम्ही स्वीकारा. आम्ही तो लोकसभेत स्वीकारला, त्यावर काम केले.  आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटीव्हमुळे आम्ही हरलो.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे नवीन संकेतस्थळ

महाराष्ट्र राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 17 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथील विधानभवनातील समिती सभागृहामध्ये अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे.

Web Title: Cm devendra fadnavis criticized to mva about evm assembly election accusation nagpur winter session 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 04:14 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • maharashtra election 2024

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.