Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रमी’चा डाव अन् अडकले माणिकराव; बेलगाम मंत्र्यांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? लवकरच फैसला

Manikrao kokate: माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार देखील नाराज असल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोकाटे यांना सुनावले होते. लवकरच कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 25, 2025 | 07:54 PM
Devendra Fadnavis: 'रमी'चा डाव अन् अडकले माणिकराव; बेलगाम मंत्र्यांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? लवकरच फैसला

Devendra Fadnavis: 'रमी'चा डाव अन् अडकले माणिकराव; बेलगाम मंत्र्यांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज? लवकरच फैसला

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/Devendra Fadnavis: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांच्या वक्तव्यांवर नाराज असल्याचे समजते आहे. याबाबत त्यांनी मित्रपक्षांशी देखील चर्चा केल्याचे समजते आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत सापडले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले होते. त्यानंतर कोकाटे यांनी त्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना शेतकरी नव्हे तर शासन भिकारी आहे असे वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेलं विधान मी ऐकले नाही, मात्र त्यांनी असे विधान केले असल्यास आमच्यासाठी ते भूषणावह नसल्याचे फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या वक्तव्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे. अजित पवार आणि कोकाटे यांची लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे. तसेच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्र्यानी संकेत दिले असल्याचे समजते आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारवाई न केल्यास काही केले तरी चालते असा समज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे काही निर्णय घ्यावे लागतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे समजते आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंची खुर्ची धोक्यात? सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग

अजित पवारांची प्रतिक्रिया काय?

माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भाष्य केले आहे. कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. माझी आणि त्यांची अजून भेट झालेली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल, असे अजित पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेले आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे असे स्पष्टपणे आम्ही तिन्ही नेत्यांनी सूचना दिलेल्या आहेत.

Web Title: Cm devendra fadnavis displeasure with ajit pawar manikrao kokate online rummy and controvesrial statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
1

Devendra Fadnavis: “उद्योगांना लागणाऱ्या इमारत बांधकाम परवानगीसाठी…”; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis: “मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश
2

Devendra Fadnavis: “मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेच्या…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Devendra Fadnavis: “पुढील 8 वर्षांत पोलाद निर्मितीत…”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं
4

Maharashtra Politics: “…. ते लक्षात घेत नाहीत”; फडणवीसांनी पडळकरांना ‘त्या’ वक्तव्यावरून खडसावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.