Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मैं अकेला ही चला था मगर,…’ ; छगन भुजबळ यांच्या शायरीला CM देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात नायगावमध्ये सावित्रीबाईच्या मूळगावी आयोजित कार्यक्रमात शायरी केली, त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 03, 2025 | 08:59 PM
PM नरेंद्र मोदींनी देवाभाऊ म्हणताच देवेंद्र फडणवी.., नेमकं काय घडलं व्यासपीठावर?

PM नरेंद्र मोदींनी देवाभाऊ म्हणताच देवेंद्र फडणवी.., नेमकं काय घडलं व्यासपीठावर?

Follow Us
Close
Follow Us:

‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’, अशी शायरी छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात नायगावमध्ये सावित्रीबाईच्या मूळगावी आयोजित एका कार्यक्रमात बोलून दाखवली. त्याच्या या शायरीतही मंत्रिमंडळातून डावलल्याचा नाराजीचा सूर होता. दरम्यान त्यांच्या या शायरीला मुख्यंमत्री देवेंद्र फडवीस यांनीही प्रतिसाद देत ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ असं एकप्रकारे उत्तर दिलं आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. मंत्रिमंडळात जागा न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जाहीरपणे आपल्या भावना मांडल्या. ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या बंगल्यावरही पोहोचले होते. आता एका कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा भुजबळ आणि फडणवीस एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्याजवळील नायगाव या सावित्रीबाईच्या मूळगावी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाराज छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. ते एकत्रच कार्यक्रमाला पोहोचले असेही म्हटले जात आहे. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना उद्देशून एक शेर म्हणून दाखवला.

छगन भुजबळ म्हणाले, “हरी नरके यांनी या वाड्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यानंतर इथे स्मारक उभारायचे आम्ही ठरवले. मी त्यावेळी विधानपरिषदेचा आमदार होतो. तो निधी इथे वापरायचे ठरवले. देवेंद्र जी तुम्ही सावित्रीबाईंचे काम पुढे नेत आहात म्हणून तुमचे धन्यवाद. सावित्रीबाईच्या नावाने पुरस्कार दिला जात होता. तो पुन्हा सुरु करुन सावित्रीबाईच्या जयंतीदिनी द्यायला हवा. महात्मा फुलेंच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हायला हवे अशी विनंती करतो.” त्यानंतर त्यांनी ‘वाक़िफ़ कहाँ ज़माना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से’ हा शेर भुजबळांनी म्हटला.

भुजबळ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यांनी बोलताना भुजबळ यांना उद्देशून ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’ हा शेर म्हटला. पुढे त्यांनी नायगावच्या सरपंचांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले. सहा वर्षांनी सावित्रीबाई फुलेंची द्वीशताब्दी सुरु होणार आहे. त्याआधी सावित्रीबाईंच्या स्मारकासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: Cm devendra fadnavis shayari on chhagan bhujbal after cabinet expansion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
2

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
3

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी
4

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.