माओवाद्यांचा बालेकिल्ला भेदला! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 'या' भागात धावली लाल परी; फडणवीसांनी देखील केला प्रवास
गडचिरोली: राज्यातील प्रत्येकाला शासनाची एसटीबस ही प्रिय आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी परिवहन विभागाची एसटी बस आपल्याला मदत करत असते. एखाद्या गावात बससेवा सुरू झाल्यानंतर तीचे स्वागत देखील मोठ्या आनंदाने केले जाते. मात्र आज गडचिरोलीमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आज गडचिरोलीमधील 15 गावांना बससेवा मिळाली आहे. गरदेवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांमध्ये बससेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.
माओवाद्याच्या बालेकिल्ल्यात राज्य सरकारने बससेवा सुरू केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या इतक्या वर्षांनी या 15 गावांमध्ये लाल परी धावल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या बसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रवास केला. बससेवा सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Towards eliminating naxalism from Maharashtra !
Today is a very important day for many reasons..
माओवादियों के प्रभाव को खत्म करके गढ़चिरौली को महाराष्ट्र का पहला जिला बनाने की शुरुआत हमने कर दी है। अब 75 वर्षों बाद यहाँ के लोगों को एसटी बस देखने को मिलेगी, इसलिए आज का दिन बेहद… pic.twitter.com/yAav8u2PPM— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2025
गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगड सीमेपर्यंत जणीसाठी पक्के रस्ते आणि पूलच नव्हते. या भागात माओवाद्याची सत्ता चालत असे. गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली पोलिसांनी या भागात मोठ्या प्रमाणात कारवाई केली. पोलीस मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभगाने 32 किमी रस्ता देखील बांधले. त्यामुळे आज तब्बल 77 वर्षांनी या भागात एसटी बस धावली आहे. आता थेट छत्तीसगडच्या सीमेपर्यंत बससेवा सुरू झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोलीत अनेक विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी या बससेवेला हिरवा झेंडा दाखवला. तर स्वतः या बसमध्ये बसून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही अंतरापर्यंत प्रवास देखील केला. तर प्रवासादरम्यान त्यांनी शेजारी बसलेल्या नगरिकांसोबत संवाद देखील साधला. नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
Bridging Dreams, Connecting Lives!🛣️
Connecting over 20 remote villages, the 32.67 km Gatta-Gardewada-Todgatta-Vangeturi road and the Tadguda bridge mark a historic milestone in the region's development after 75 years of independence. CM Devendra Fadnavis is the first CM to visit… pic.twitter.com/nu1Oo7LFp0— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 1, 2025
मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज अनेक विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांच्या हस्ते पोलाद प्रकल्पाच्या नवीन टप्प्याचे देखील लोकार्पण होणार आहे. मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील हा एक मोठा उद्योग समजला जात आहे. तसेच पोलीस मुख्यालयात काही वरिष्ठ माओवादी कमांडर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शरणागती पत्करणार आहेत. गडचिरोलीमधील नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत हे एक मोठे यश समजले जात आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस हे एका दुर्गम पोलीस मदत केंद्रावर सुरक्षा जवान यांच्यासोबत संवाद साधणार आहेत.
विदर्भ नदीजोड प्रकल्प अन् गडचिरोलीचा नक्षलवाद संपवण्यासाठी ‘मास्टर प्लॅन
गडचिरोलीचा विकास होत आहे. नक्षलवाद कमी होत आहे. ज्या भागात आपण जात नव्हतो त्या भागांमध्ये आता खोलवर जाता येत आहे. निकरची लढाई होण्याची शक्यता आहे. यामधून आपण गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचे काम आपण करणार आहोत. महाराष्ट्राच्या समोर सायबर गुन्हे हे मोठे आव्हान आहे. यावर आळा घालण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व आवास योजनांमध्ये मिळणाऱ्या घरांना सोलार दिले जाणार आहे. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न असणार आहे.जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे