Kabutar Khana News: "... हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान
मुंबई: दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने ताडपत्री टाकत हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी ताडपत्री काढून कबुतरांना खाणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांनतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. हायकोर्टाने बंदी कायम ठेवली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. दरम्यान आज हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम ठेवली आहे.
मुंबई हायकोर्टाने आजची सुनावणी झाल्यावर कबुतरांना अन्न, पाणी देण्यासाठी तूर्तास बंदी कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टात ४ आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे जैन समाज आता काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान आता या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे, ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यामध्ये दोन गोष्टी स्पष्टपणे पाहायला मिळतात. एक म्हणजे लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आरोग्याचं रक्षण झालंच पाहिजे. दुसरा म्हणजे आस्थेचा विषय आहे. याचीही आपण काळजी घेऊ शकतो. त्यातून मार्ग काढू शकतो.
ज्या ठिकाणी वस्ती नसेल त्या ठिकाणी देखील आपण फिडींगसाठी काही करू शकतो. हा वादाचा मुद्दा नाहीये. हा समाजचा विषय आहे. समाजाचे आरोग्य आणि समाजाची आस्था लक्षात घेऊन, आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
मुंबई हायकोर्टाने तूर्तास तरी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम ठेवली आहे. सार्वजनिक आरोग्य महत्वाचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आता पुढील सुनावणी चार आठवडयांनी होणार आहे. पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिले जाऊ शकत नाही असे कोर्टाने म्हटल्याचे समजते आहे. पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी असेल असे हायकोर्टाने म्हटले आहे. नागरिकांकडून हरकती पालिकेने मागवून घ्याव्यात. त्यानंतर कंट्रोल फिडींगसाठी परवानगी देता येईल का याचा निर्णय मुंबई महापालिकेने घ्यावा.
मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
दादरमधील कबुतरखान्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. लोकप्रिय असलेला हा कबूतरखाना मुंबई पालिकेकडून बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खायला घालण्याबाबत मुंबई हायकोर्टाने निकाल दिला. तसेच कबूतरांमुळे अनेकांना दम्याचा त्रास होत असल्यामुळे लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाना बंद करण्यात आला आहे. कबूतरखानाच्या या वादाला आता धार्मिक वादाचे स्वरुप आले आहे. जैन समाजाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहे.