CM देवेंद्र फडणवीसांची महायुतीच्या मंत्र्यांना तंबी, म्हणाले, यापुढे एकही चूक झाली तर...
वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती यामुळे अलिकडे महायुती सरकार अडचणीत आलं आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतला. यापुढे मंत्री आणि आमदारांकडून अशा चूका खपवून घेतल्या जाणार नाही, अशी तंबीच त्यांनी दिली आहे.
महिला बचत गटांसाठी उमेद मॉल, विशेष न्यायालये अन्…; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय
अलिकडे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे नेत संजय शिरसाट यांचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या बागेत पैसे असल्याचं दिसत होतं. त्यानंतर विधानसभेच्या लॉबीत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. हा वाद निवळत नाही तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे सरकारची नाचक्की झाली. माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी या व्हिडिओवरून वादग्रस्त विधाने देखील केली. त्यामुळे या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी, ई बाईक ॲप आता सरकार चालवणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची कानउघाडणी केली. ‘वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. असेच वादग्रस्त प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करूच. आता एकही प्रकार खपवून घेणार नाही.’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या आणि कृती करणाऱ्या मंत्र्यांना दम दिला आहे.
दरम्यान सध्या माणिकराव कोकाटेंच्या रमी गेमचा आणि त्यांच्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडूनही मागणी केली जात आहे. त्यातूनच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यामुळे हा मुद्दा अधिकच तापला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी देखील आज माणिकराव ठाकरे यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. आज दुपारी कोकाटे अजित पवारांच्या भेटीलाही गेल्याचीही माहिती आहे. त्यामुळे राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दरम्यान आजच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामुध्ये १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’, विशेष न्यायालयांची स्थापना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यासारखे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मोजकेच मंत्री उपस्थित होते.