Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ शिंदे हे नाममात्र मुख्यमंत्री, नाना पटोले यांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टिका

महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून, फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, तसेच एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 03:42 PM
एकनाथ शिंदे हे नाममात्र मुख्यमंत्री, नाना पटोले यांची एकनाथ शिंदेंवर बोचरी टिका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या राज्यात वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळं यावर बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. यावरुनच आता विरोधक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याचे काम करत आहेत, टिका करत आहेत. महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून, महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी-शाह (modi shah) यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून, फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, तसेच एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी केला आहे.

[read_also content=”कांगारु टेन्शनमध्ये? भारत दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे ‘हे तीन’ स्टार खेळाडू संघाबाहेर https://www.navarashtra.com/sports/australia-cricket-team-three-star-players-out-of-team-325765.html”]

दरम्यान, राज्यात गुंतवणूक आणण्याच्या प्रयत्नातूनच महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉनशी चर्चा केली होती. महाराष्ट्र सरकार व वेंदाता-फॉक्सकॉन यांच्यात अंतिम टप्प्यापर्यंतच्या वाटाघाटीही झाल्या होत्या तसेच पुण्याजवळच्या तळेगावची जागा गुजरातमधील जागेपेक्षा जास्त फायदेशीर होती. महाराष्ट्र सरकारकडूनही या प्रकल्पासाठी चांगले पॅकेज दिले होते, पण राज्यात सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आला. तळेगावमध्ये हा प्रकल्प झाला असता तर लाखो रोजगारासह त्या भागात छोट्या-मोठ्या उद्योगाची साखळी निर्माण झाली असती. यातून राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला असता. पण महाराष्ट्रातील हा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये जाईपर्यंत ईडी सरकारने झोपा काढल्या आणि प्रकल्प गुजरातमध्ये गेला याचे खापर भाजपाचे नेते मविआ सरकारवर फोडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या २०१४-१९ या सत्ताकाळात मुंबईतील प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय वित्त सेंटर, डॉकयार्ड, हिरे व्यापार गुजरातला गेला आणि आता फॉक्सकॉनही गुजरात गेला. भाजपाचे षडयंत्र पहाता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Web Title: Cm eknath shinde only for name nana patole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 03:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Gujrat
  • Nana patole
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

Operation Tiger : “शिंदेगट डेडबॉडी.. देवेंद्र फडणवीसांकडून त्यांचं ऑपरेशन सुरु; खासदार संजय राऊतांचा चढला पारा
1

Operation Tiger : “शिंदेगट डेडबॉडी.. देवेंद्र फडणवीसांकडून त्यांचं ऑपरेशन सुरु; खासदार संजय राऊतांचा चढला पारा

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय
2

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय

Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या ‘दरे’ दौऱ्यावर; खाजगी भेटीत दडलीये राजकीय रणनीती?
3

Satara: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या ‘दरे’ दौऱ्यावर; खाजगी भेटीत दडलीये राजकीय रणनीती?

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश
4

Eknath Shinde: “निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या”, एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.