one minister one department shinde government descision nrvb
मुंबई : राज्यात भाजप व एकनाथ शिंदे गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने कामाचा धडाका सुरु केला आहे. यातच विरोधक आणि सत्ताधारी अनेकवेळा भिडले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळं प्रशासन खडबडून जागे झाले आहे, तसेच धमकीचा फोन कुठून आला याचा पोलीस शोध घेताहेत.
[read_also content=”दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारताची सावध सुरुवात https://www.navarashtra.com/latest-news/south-africa-won-the-toss-and-decided-to-bowl-first-332184.html”]
दरम्यान, या धमकीच्या फोननंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा अधिक कडेकोट तसेच कडक असावी असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय किंवा निष्काळजीपण नको असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळं आता पूर्वीपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा धमकीचा निनावी फोन आला आहे. (Death threats phone call) स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी शिंदेंना देण्याती आली आहे. यामुळं ठाण्यातील घरी व वर्षा शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या धमकीची गुप्तचर विभागाला मिळाली माहिती आहे. धमकीचा निनावी फोन कोणी केला याचा पोलीस शोध घेताहेत.