Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis on MPSC : MPSC तर्फे होणार ‘या’ पदांसाठी विक्रमी भरती; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा!

Devendra Fadnavis on MPSC : गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरही सरकार अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 06:10 PM
fadnvis

fadnvis

Follow Us
Follow Us:

Devendra Fadnavis on MPSC : महाराष्ट्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणाऱ्या आगामी परीक्षांमध्ये पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इतकेच नाही तर, गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरही सरकार अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे.

महाभरतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सरकार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत कोणतीही कसर सोडणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीत पाच वेगवेगळ्या विभागांनी आपल्याकडील रिक्त पदांबाबत सविस्तर सादरीकरण केले. आगामी भरतीत विशेषतः गट-क संवर्गातील क्लर्क-टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट आणि असिस्टंट मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर (AMVI) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांच्या संख्येत मोठी वाढ केली जाणार आहे.

पुढील भरती प्रक्रियेत इतक्या मोठ्या संख्येने पदे आणली जातील की MPSC च्या इतिहासातील सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठीही स्वतंत्र आणि भक्कम व्यवस्था उभारण्यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी

परीक्षा पद्धतीत पुन्हा बदल होणार? डिस्क्रिप्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह?

राज्यसेवा, कृषी, अभियांत्रिकी आणि एफएसओ (FSO) यांसारख्या परीक्षांची तयारी करणारे उमेदवार ‘वर्णनात्मक’ (Descriptive) पॅटर्न रद्द करून पुन्हा जुना ‘वस्तुनिष्ठ’ (Objective / MCQ) पॅटर्न लागू करण्याची मागणी करत आहेत. यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आयोगाच्या कारभारात आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व्ही. राधा (V. Radha) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

यापूर्वी दलवी समितीच्या शिफारशींनुसार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला गेला होता. मात्र, व्ही. राधा समितीने जर पुन्हा ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्न लागू करण्याची शिफारस केली, तर सरकार ती उघड्या मनाने स्वीकारण्यास तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप

‘व्ही. राधा’ समितीकडे २० हजारांहून अधिक सूचना

समितीला आतापर्यंत २०,००० पेक्षा जास्त ई-मेल आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. उत्तरपत्रिकांच्या तपासणीत पूर्ण पारदर्शकता असावी आणि दरवर्षी परीक्षा व निकालांचे एक निश्चित कॅलेंडर (Exam Calendar) जाहीर केले जावे, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.ही समिती केवळ परीक्षा पॅटर्नपुरती मर्यादित नसून प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित वितरण, परीक्षेची मानक कार्यपद्धती (SOP), गुण गुणसूत्र पद्धती आणि अचानक परीक्षा रद्द झाल्यास निवड झालेल्या उमेदवारांच्या हितसंबंधांचे रक्षण यावरही ठोस नियमावली तयार करत आहे.

Web Title: Mpsc bumper recruitment devendra fadnavis on mpsc announcement exam pattern change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Government Job
  • Jobs Recruitment
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?
1

MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती
2

Pune Recruitment 2026: शिक्षकांसाठी मोठी संधी! पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये विविध पदांची भरती; २८ सप्टेंबरला थेट मुलाखती

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
3

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?
4

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.