Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना…”; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2025 | 02:35 AM
Devendra Fadnavis: "कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना..."; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis: "कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना..."; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी समुदायांच्या कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला चालना देण्यासाठी किरकोळ वनोपज तसेच धान्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्य रस्त्यालगत छोट्या आकाराची नवीन गोदामे उभारण्यात येत आहेत. अन्न-धान्य व लहान वन उत्पादने (एमएफपी) साठवण्यासाठी गोदामांच्या बांधकामासाठी ‘नाबार्ड’कडून औपचारिक भागीदारीतून मिळालेल्या उत्कृष्ट सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य व ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना यामधून गडचिरोली या आकांक्षी जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक क्षमतेनुसार शासकीय जमिनीवर गोदामे उभारण्यात येत आहेत. ही गोदामे किरकोळ वनोपजांसाठी कापणी पश्चात व्यवस्थापन यासह वर्गीकरण, प्रतवारी, साठवणूक यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

प्रायोगिक तत्वावरील नवीन गोदाम बांधकाम करण्यासंदर्भात कामे होत असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हा यासाठी नोडल विभाग म्हणून तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: “राज्याच्या प्रगतीमध्ये ॲमेझॉन कंपनीची…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

आकांक्षी जिल्हा म्हणून गडचिरोलीतील आदिवासी आणि ग्रामीण समुदायांच्या कृषी आणि वन-आधारित उपजीविकेला याद्वारे मोठी चालना देण्यात येणार आहे. अशा गोदामांच्या बांधकामांद्वारे कृषी व पणन क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामविकास आणि जलसंधारणाच्या कामांसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाची नाबार्डच्या माध्यमातून लगेचच दखल घेण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या सहभागाने होत असलेल्या आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी उपक्रमाबद्दल बँकेच्या अध्यक्षांचे पत्र लिहून अभिनंदन केले.

ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत कामांसाठी २ हजार ११५ कोटी रुपये तरतूद

शासनाने कालमर्यादेत हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेतला असून, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समन्वयातून या संदर्भातील कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत विविध शासकीय विभागाअंतर्गत कामांसाठी सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात एकूण २ हजार ११५ कोटी रुपये तरतूद केली होती, त्यामध्ये यावर्षी ९२० कोटी २९ लक्ष रुपये अतिरिक्त वाढ केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी १३८ कोटी रुपये तरतूद आहे.

Devendra Fadnavis : “गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक…”, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

गोदाम उभारणीसाठी नाबार्ड, बायफ व वॉटर संस्थांचा सहभाग

‘नाबार्ड’च्या जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमार्फत ५ प्रस्ताव सादर करण्यात आले असून, आरआयडीएफ व नाबार्ड पायाभूत विकास सहाय्य आर्थिक मदत योजनेअंतर्गत यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नाबार्डचे प्रमुख के. व्ही. शाजी यांनी दिली.

Web Title: Cm fadnavis said forest based livelihoods boosted nabard involvement in agriculture sectors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gadchiroli
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हेच या सरकारचे धोरण”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही
1

Devendra Fadnavis: “… हेच या सरकारचे धोरण”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?
2

“डिजिटल इंडिया आणि डिजिटल व्यवहारांमुळे महाराष्ट्र…”; काय म्हणाले मंत्री आशिष शेलार?

Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?
3

Devendra Fadnavis: ड्रोनने केलेले पंचनामे स्वीकारले जाणार? मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय म्हणाले?

Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?
4

Marathwada Rain: “सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर…”; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.